शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

रेतीघाट बंद असतानाही कंत्राटाची बांधकामे जोरात सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2019 1:09 AM

जिल्हाभरातील रेती घाट बंद असताना शासकीय कामे कंत्राटदारांकडून कशी काय सुरू आहेत, या बांधकामांना रेती कुठून येत आहे. बिलासोबत जोडावयाची रेतीची टीपी कोणती जोडली जाणार आहे. याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

ठळक मुद्देरात्रीच्या सुमारास केली जात आहे चोरी : शासकीय अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याचा होत आहे आरोप

अरूण राजगिरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव/चोप : जिल्हाभरातील रेती घाट बंद असताना शासकीय कामे कंत्राटदारांकडून कशी काय सुरू आहेत, या बांधकामांना रेती कुठून येत आहे. बिलासोबत जोडावयाची रेतीची टीपी कोणती जोडली जाणार आहे. याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.घोडाझरी सिंचन विभागांतर्गत येत असलेल्या चोप येथील पाटलीन तलावाचे कोट्यवधीचे काम सुरू आहे. एकाही ट्रिपची रॉयल्टी न काढता अवैधपणे रेतीची वाहतूक सुरू आहे. सर्रासपणे वाळूचा गोरखधंदा सुरू झाला आहे. शाळकरी विद्यार्थ्यांचा वापर करून रात्री रेतीची चोरी केली जात आहे. रेतीची चोरी झाल्यास ट्रॅक्टर मालकावर एक लाख रूपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद आहे. संबंधित कर्मचाºयांना थोडी चिरीमिरी देऊन कमी पैशात ट्रॅक्टर सोडली जात आहे. त्यामुळे रेती वाहतूकदारांची हिंमत वाढत चालली आहे. अनेकांना घरकूल मंजूर झाले आहेत. मात्र रेती मिळत नसल्याने गरीबांच्या घराच्या कामाला अजूनपर्यंत सुरूवात झाली नाही. मात्र शासकीय कामे बिनधास्तपणे सुरू आहेत. शासकीय कामासाठीच रेतीची तस्करी होत असताना शासकीय अधिकारी मात्र मूग गिळून आहेत. त्यांचे हात बांधले असावे, त्यामुळे ते चुपी साधून आहेत, असा आरोप होत आहे. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आहे.रेती घाटांचा प्रस्ताव शासन दरबारीच पडूनगडचिरोली : रेती घाटांना परवानगी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने रेती घाटांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. मात्र अजूनपर्यंत या प्रस्तावावर निर्णय झाला नाही. इतर जिल्ह्यांच्या प्रस्तावांना मान्यता देणे सुरू झाले आहे. त्यामुळे एकदोन दिवसात मान्यता मिळेल, अशी माहिती अधिकाºयांनी दिली. गडचिरोली शहरातही मोठ्या प्रमाणात नाली, रस्ता व इतर बांधकाम सुरू आहेत. चोरीची रेती अतिशय निकृष्ठ दर्जाची असतानाही बांधकाम केले जात असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :sandवाळू