जांभळी येथे तलाठी सजाची निर्मिती करण्यात आली आहे; परंतु हे तलाठी कार्यालय कधी पिसेवडधा, तर काही दिवस मानापूर येथून सांभाळले जात आहे. त्यामुळे जांभळी परिसरातील शेतकऱ्यांचे जमिनीचे फेरफार व संबंधित अनेक रखडलेली कामे करण्यासाठी हेलपाटे मारावे लागतात. यापूर्वी तहसीलदारांना निवेदन देऊन तलाठी कार्यालय जांभळी येथे सुरू करण्याची मागणी करण्यात आली. परंतु त्यावर कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून तलाठी कार्यालय नियमितपणे व स्थायी व्यवस्थेसाठी सरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
बाॅक्स
दाखल्यांसाठी १२ कि.मी.चा प्रवास
जांभळी सजात काेणत्या कर्मचाऱ्याची तलाठी म्हणून नियुक्ती केली आहे, याबाबत शेतकऱ्यांना माहिती नाही. सात-बारा व अन्य दाखल्यांसाठी शेतकऱ्यांना १० ते १२ कि.मी.चा प्रवास करावा लागत आहे. गावात हक्काचे तलाठी कार्यालय मंजूर असताना दुसऱ्या गावी दाखले व सात-बारा आणण्यासाठी जावे लागते. ही समस्या गंभीर आहे, असे गावकऱ्यांनी म्हटले आहे.