लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासकीय बंदी असतानाही किराणा दुकानातून खर्रा व तंबाखूजन्य पदाथार्ची विक्री करणाऱ्यांकडून साहित्य जप्त करून नष्ट करण्यात आले. मुक्तिपथ गाव संघटना, पोलीस पाटील यांच्या सहकार्याने विविध ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा म्हणून काही काळासाठी किराणा दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. याचा फायदा घेत किराणा दुकानदारांकडून खर्रा व इतरही तंबाखूजन्य पदार्थ्यांची विक्री होत आहे. त्याचबरोबर पानठेलाधारक घरांमधून लपून छपून तर कुठे उघडपणे खर्राविक्री करीत आहे. हा प्रकार थांबण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटना, तालुका चमू आणि गाव प्रशासनाच्या सहकार्याने अशा विक्रेत्यांकडून तंबाखूजन्य पदार्थ व खर्रा घोटण्याचे साहित्य जप्त करून ते नष्ट केले जात आहे.धानोरा शहरासह गट्टा, जप्पी आणि ढवळी येथील दुकानांची तपासणी करून सुगंधित तंबाखू नष्ट करण्यात आला. त्याचबरोबर कोरची शहरातील दुकानांची तपासणी करून असे पदार्थ ताब्यात घेत नष्ट करण्यात आले. कुरखेडा तालुक्यातील चांदोणा, गोठणगाव आणि भामरागड तालुक्यातील जुव्वी या गावांतील किराणा व डेली निड्सच्या दुकानांमधून खर्रा, सुगंधित तंबाखू व इतरही साहित्य नष्ट करण्यात आले. कोरोना संचारबंदीच्या काळात तंबाखू व दारू विक्रीविरूद्ध मोहीम तीव्र झाली आहे.मुरखळा, वाकडी येथे खर्रा विक्रेत्यांच्या घरी धाडपानठेले बंद असल्याने काही खर्राविक्रेत्यांनी घरीच खर्रे घोटून त्याची गुपचुप विक्री सुरू केली आहे. चामोर्शी तालुक्यातील मुरखळा आणि वाकडी गावांमध्ये अशा प्रकारे खर्रा विकणाऱ्यांच्या घरी धाड मारून खर्रा बनविताना रंगेहात पकडण्यात आले. सर्व साहित्य नष्ट करून विक्री न करण्याची तंबी देण्यात आली.खर्राविक्रीचे साहित्य ग्रामपंचायतमध्ये जमादेसाईगंज तालुक्यातील तुळशी या गावी एका किराणा दुकानात मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ गाव संघटनेने ताब्यात घेतले. विशेष म्हणजे किराणा दुकानदाराच्या घरी खर्रा तयार करून त्याची विक्री सुरू होती. तपासणीत हे लक्षात येताच सर्व साहित्यासह खर्रा घोटाई पट्टी आणि रंदा देखील जप्त करून ग्रामपंचायतमध्ये जमा करण्यात आला.
किराणा दुकानातील तंबाखूजन्य साहित्य नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 5:00 AM
लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा म्हणून काही काळासाठी किराणा दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. याचा फायदा घेत किराणा दुकानदारांकडून खर्रा व इतरही तंबाखूजन्य पदार्थ्यांची विक्री होत आहे. त्याचबरोबर पानठेलाधारक घरांमधून लपून छपून तर कुठे उघडपणे खर्राविक्री करीत आहे.
ठळक मुद्देलॉकडाऊनचे उल्लंघन : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारी आवश्यक