लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : बामणी पोलिसांनी गर्कापेठा येथील हातभट्टीच्या ठिकाणी धाड टाकून जवळपास पाच लाखांचा ७५ ड्रम सडवा नष्ट केला. हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या.तालुक्यातील गर्कापेठा येथील दारूविक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात गुळाचा सडवा टाकला असल्याची माहिती बामणी पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस अधिकारी शेख व त्यांच्या पथकाने ५ ऑक्टोबर रोजी सोमवारला सकाळी ७ वाजता विशेष अभियान राबवत गावात तपासणी केली. दरम्यान ४ लाख ९१ हजारांचा ७५ ड्रम सडवा व इतर साहित्य पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी तो संपूर्ण मुद्देमाल नष्ट करून गावात दारूविक्री न करण्याचे आवाहन केले.गर्कापेठा येथील गाव संघटनेच्या पुढाकारातून दीड वर्षांपासून गावात दारूविक्री बंद आहे. मात्र काही विक्रेत्यांनी गुळ आणून सडवा टाकला होता. गावातील विविध ठिकाणी ५० ड्रम सडवा टाकला असल्याची माहिती मुक्तिपथ चमूला मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी यांना कळविण्यात आले. स्वामी यांनी गर्कापेठा येथे अभियान राबविण्याचे निर्देश बामणी पोलिसांना दिले. प्रभारी पोलीस अधिकारी शेख व त्यांचे पथक गर्कापेठा येथे रवाना होऊन गावातील १३ ते १४ विविध ठिकाणांची पाहणी केली. दरम्यान गावातील मेडी दुर्गम, सुनीता महेश दुर्गम, तिरुपती कुमरी, गौरया जाळी, शंकर राजम जाळी, समया कोंडागुर्ला, राजन्ना कोंडागुर्ला यांच्या घर परिसरात मोठ्या प्रमाणात गुळाचा सडवा आढळून आला असून आरोपी फरार आहेत. ७३ ड्रम गुळाचा व २ ड्रम मोह सडवा, ५० लिटर दारू, १३ पेट्या गूळ व दारू गळण्याचे साहित्य, असा एकूण ४ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला.बामणी पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारूविक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सिरोंचा तालुक्याच्या दुर्गम भागातही पोलिसांच्या दारूविरोधी कारवाया वाढल्या असल्याचे दिसून येते.पुराडातील ७ दुकानांवर दंडात्मक कारवाई४कुरखेडा तालुक्यातील पुराडा येथे पोलीस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या मोहीम राबवत गावातील सात दुकानाची तपासणी केली. दरम्यान सातही दुकानांतून तंबाखूजन्य पदार्थ आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करीत ३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. संपूर्ण मुद्देमालाची होळी करून पुन्हा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याचे आवाहन देखील करण्यात आले. गावात छुप्या मागार्ने तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक पोलीस व मुक्तिपथच्या तालुका चमूला मिळताच संयुक्तरित्या दुकानांची तपासणी केली. दरम्यान कुरखेडा शहराच्या सात दुकानांमध्ये सुगंधित तंबाखू, गुळाखु, खर्रा, नस आदी तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. त्या दुकानदारांकडून एकूण तीन हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई पुराडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एस.गोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई गणेश भर्रे, रवी उसेंडी, अवकाश मितनवरे यांनी केली.
पाच लाखांचा सडवा नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2020 5:00 AM
तालुक्यातील गर्कापेठा येथील दारूविक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात गुळाचा सडवा टाकला असल्याची माहिती बामणी पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस अधिकारी शेख व त्यांच्या पथकाने ५ ऑक्टोबर रोजी सोमवारला सकाळी ७ वाजता विशेष अभियान राबवत गावात तपासणी केली.
ठळक मुद्देगर्कापेठा येथील हातभट्ट्या उद्ध्वस्त : बामणी पोलिसांची कारवाई