लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कंत्राटी नर्सेसचा इतर कर्मचारी संघटनांनी स्वत:च्या हितासाठी उपयोग करून घेतला असल्याने यापुढे कोणत्याही संघटनेच्या मागे न जाता स्वत:च्या हक्कांसाठी स्वत:च लढा देण्याचा निर्धार कंत्राटी नर्सेस संघटनेने रविवारी पार पडलेल्या बैठकीत केला आहे.ग्राम पंचायत भवनात पार पडलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी माया सिरसाट होत्या. प्रमुख अतिथी म्हणून दीपक चौधरी होते. सदर सभा महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद कंत्राटी आरोग्य सेविका संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष परमानंद मेश्राम यांच्या नेतृत्त्वात बैठक पार पडली. कंत्राटी आरोग्य सेविका २००५ पासून राज्य शासनाच्या आरोग्य सेवेत कार्यरत आहेत. अनेक संघटनांनी कंत्राटी आरोग्य सेविकांना स्वत:च्या संघटनेत सामावून घेतले. मात्र कंत्राटी आरोग्य सेविकांच्या समस्यांकडे त्यांनी लक्ष दिले नाही. स्वत:च्या संघटनेची सदस्य संख्या वाढवून शासनावर दबाव टाकून स्वत:च्या मागण्या पूर्ण करण्याचा गैरफायदा इतर कर्मचारी संघटनांनी उचलला आहे. त्यामुळे भविष्यात आता कोणत्याही संघटनेच्या मागे न जाता आपल्या समस्या आपण स्वत:च संघर्ष करून सोडवू, असे आवान कंत्राटी नर्सेस संघटनेच्या जिल्हाध्यक्ष शर्मिला जनबंधू यांनी केले.कंत्राटी आरोग्य सेविकांना फक्त राबवून घेतले जात आहे. या सेविकांच्या कामाचे मूल्यमापन त्यांच्या जॉबकार्डनुसार करावे, मानधनात वाढ करावी, बोनसची रक्कम त्वरित द्यावी, हॉर्डशिप अलाऊंस देण्यात यावा आदी मागण्यांना धरून लवकरच तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा बैठकीदरम्यान देण्यात आला.सभा यशस्वी करण्यासाठी संघटनेच्या जिल्हा सचिव लाजूरकर, कार्याध्यक्ष बोडावार, नागदेवते, कोषाध्यक्ष पेशट्टीवार, माधुरी कांबळे, आशा लुटे, सुरमवार, वनपल्लीवार, जांभुळकर, वनकर, कोतपल्लीवार यांच्यासह इतर कंत्राटी नर्सेस संघटनेनी सहकार्य केले. याच सभेदरम्यान तालुकानिहाय नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली.
नर्सेसचा हक्कांसाठी लढ्याचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 1:06 AM
कंत्राटी नर्सेसचा इतर कर्मचारी संघटनांनी स्वत:च्या हितासाठी उपयोग करून घेतला असल्याने यापुढे कोणत्याही संघटनेच्या मागे न जाता स्वत:च्या हक्कांसाठी स्वत:च लढा देण्याचा निर्धार कंत्राटी नर्सेस संघटनेने रविवारी पार पडलेल्या बैठकीत केला आहे.
ठळक मुद्देकंत्राटी आरोग्य सेविकांची सभा : इतर संघटनांनी गैरफायदा घेतल्याचा आरोप