जिल्हास्तरावरून भाऊबीज भेटीचे वितरण करूनही प्राथमिक आराेग्य केंद्र स्तरावरून देऊळगाव, भाकराेंडी व इतर प्राथमिक आराेग्य केंद्रांमध्ये मानधनाचे वितरण करण्यात आले नाही. अल्पसे मानधन असूनही नियमित वितरण केले जात नाही. यासाठी पाठपुरावा करणे. लसीकरण सत्रास उपस्थित राहिल्यास त्याचे मानधन वितरण करणे. काेराेनाकाळात आराेग्यसेविकेसाेबत कामे केल्याने स्री परिचरांना ग्रामपंचायत स्तरावरून एक हजार रुपये मानधन देणे अपेक्षित हाेते. मात्र मानधन देण्यात आले नाही. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच अंशकालीन परिचरांचे कामाचे तास ठरविण्यात यावे. दहावी, बारावी पास असलेल्या स्री परिचरांना नर्सेसचे प्रशिक्षण देण्याविषयी काेटा ठरवून देण्यात यावा आदी मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली.
सभेला आराेग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र खरवडे, सरचिटणीस विनाेद साेनकुसरे, माेहन भुरसे, जिल्हाध्यक्ष रेखा सहारे, उषा मडावी, वैशाली शास्रकार, तरुणा पवार, भूमिका सेलाेटे, पंचफुल्ला लिंगे, सुरेखा केळझरकर, वर्षा मडावी, कविता चंदनखेडे, लक्ष्मी गावळे, संगमा खाेब्रागडे, ज्याेती दुर्गे, शीलाबाई रायपुरे, सुनीता फुलबांधे, सुनीता गेडाम, वर्षा मडावी, रेखा शंभरकर, माधुरी कोठारे, सुनीता गेडाम, लोकमुद्रा खोब्रागडे, श्यामलता कुंभारे, संगीता मडावी, रेखा सहारे, वनिता भांडारकर, चंदा मंडल, शेवंता मडावी, अंजली बोरकर, सरोज लाडे, इंदिरा मादुरवार यांच्यासह जवळपास १०० अंशकालीन स्री परिचर उपस्थित हाेत्या.