शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

दारू व खर्राविक्री बंदीचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 12:05 AM

खर्रा आणि दारूची विक्री बंद करण्यासाठी एटापल्ली तालुक्यातील सूरजागड इलाक्यातील ७२ गावांतील गाव संघटनांची बैठक बुधवारी गट्टा येथे पार पडली. या बैठकीत गावांतून दारूविक्री पूर्णत: बंद करणे तसेच खर्रा विक्रीची दुकाने बंद करण्यासह इतरही अनेक विषयांवर चर्चा झाली.

ठळक मुद्देमुक्तिपथ अभियान : सूरजागड इलाक्यातील ७२ गावातील पदाधिकाऱ्यांची गट्टात बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : खर्रा आणि दारूची विक्री बंद करण्यासाठी एटापल्ली तालुक्यातील सूरजागड इलाक्यातील ७२ गावांतील गाव संघटनांची बैठक बुधवारी गट्टा येथे पार पडली. या बैठकीत गावांतून दारूविक्री पूर्णत: बंद करणे तसेच खर्रा विक्रीची दुकाने बंद करण्यासह इतरही अनेक विषयांवर चर्चा झाली.तालुक्यातील जांभिया, मोडूस्के, पुरसलगोंदी, हेड्री, वांगेतुरी, मर्दाकुही, देवपायली ही गावे वगळता इलाक्यातील इतर गावांना अद्याप दारूविक्री बंदी साध्य करता आलेली नाही. या गावांना दारूबंदी साध्य करण्यासाठी तसेच बंदी असलेल्या गावांना ती टिकविण्यासाठी काय प्रयत्न करता येतील यावर बैठकीत चर्चा झाली. सर्वच गावे आदिवासीबहुल असल्याने गावठी दारू मोठ्या प्रमाणात गाळली जाते. परंतु काही जण या दारूची विक्री करतात. त्यामुळे अशा विक्रेत्यांवर अंकुश आणण्यासाठी गावांमध्ये संपूर्ण दारूबंदीचा ठराव घेणे आवश्यक आहे. याबाबत बैठकीत चर्चा झाली. अनेक गावांनी हा ठराव घेण्याची तयारी दर्शविली.दारूमुळे आरोग्यावर विपरित परिणाम होतात. याची माहिती मुक्तिपथ चमूंनी लोकांना सांगितली. दारूमुळे गावांचे सामाजिक आरोग्यही बिघडत आहेत. बहुतेकांचा मूळ व्यवसाय शेती आणि शेतमजुरी आहे. हातात खूप पैसा नसतोच. त्यामुळे असलेला थोडा पैसाही दारूत गेल्याने लोकांचेच आर्थिक नुकसान होत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्याचबरोबर अनेक जण खर्रा खाताना आढळतात. आदिवासी समाजात पूजेसाठी खर्रा मुळीच चालत नाही. त्यामुळे दारूसोबतच गावांतून खर्राविक्री बंद करण्यासाठी ठराव घेणार असल्याचे अनेक पदाधिकाºयांनी सांगितले. बैठकीला गट्टाचे पोलीस पाटील कन्ना गोटा, भूमैया रामू गोटा, दर्देवाडा येथील भूमैया सैनू महा, बोदूरचे पोलीस पाटील कुल्ले कोवारे यांच्यासह ७२ गावांतील गाव संघटनेचे सदस्य तसेच अनेक गावांचे पोलीस पाटील, भूमैया उपस्थित होते. बैठकीसाठी मुक्तिपथ तालुका चमूने सहकार्य केले.‘पोलो’ ठेवून घेणार दारूविक्री बंदीचा ठरावजिल्ह्यातील आदिवासी गावांमध्ये साप्ताहिक सुटीप्रमाणे ‘पोलो’ ठेवण्याची प्रथा प्रचलित आहे. प्रत्येक गावाचा दिवस वेगवेगळा असतो. या दिवशी गावातील सर्वच लोक शेतावर न जाता सुटी घेऊन घरीच थांबतात. दारू आणि खर्रा बंदीसाठी ‘पोलो’ ठेवण्याचा निर्णय यावेळी अनेक गावांनी घेतला. तसेच पोलो असलेल्या दिवशी दारू व खर्रा बंदीचा ठराव घेणार असल्याचेही सांगितले.सूरजागड यात्रा तंबाखूमुक्त करणारएटापल्ली तालुक्यातील सूरजागड येथे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ठाकूरदेवाची यात्रा भरते. आदिवासी समाजात या यात्रेला फार महात्त्व आहे. जिल्ह्यातीलच नव्हे तर लागूनच असलेल्या बस्तर भागातील आदिवासी मोठ्या संख्येने यात्रेत दाखल होतात. दारू व तंबाखूमुक्तीचा संदेश नागरिकांपर्यत पोहोचविण्यासाठी ही यात्रा तंबाखू व खर्रा मुक्त करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ग्रामस्थांनी या इलाका बैठकीत सांगितले.

टॅग्स :liquor banदारूबंदी