लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यसरकारी, जिल्हा परिषद, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी ७ ते ९ आॅगस्ट या कालावधीत लाक्षणिक संप करतील, असा निर्धार जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला.या बैठकीला राज्य कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, जि.प.कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस दुधराम रोहणकर, उपाध्यक्ष संजय खोकले, ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपुरकर, विभागीय उपाध्यक्ष प्रदीप भांडेकर, कोषाध्यक्ष खुशाल नेवारे, विभागीय संघटक अर्चना श्रीगिरवार, श्रीकृष्ण मंगर, मोनाक्षी डोहे, व्यंकटेश कंबगौणी, फिरोज लांजेवार, डॉ.विजय उईके, डॉ.गणपत काटवे, प्रमोद कावळकर, मंगला बिरनवार, छबू पिसे, माया सिरसाट, छाया मानकर, कैलास भोयर, गजानन ठाकरे, राजू रेचनकर आदी उपस्थित होते.जुनी पेंशन योजना लागू करा, केंद्रातील कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग व सोयीसुविधा द्या, रिक्तपदे तत्काळ भरा, महागाईभत्ता लागू करा, मागील १४ महिन्यांची थकबाकी रोखीने द्या, अनुकंपातत्त्वावर नियुक्तीसाठी पात्र असलेल्या सर्व उमेदवारांना एकाचवेळी विशेष बाब म्हणून शासकीय नोकरीत सामावून घ्या, पाच दिवसांचा आठवडा लागू करा, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष करा, खासगीकरण व कंत्राटीकरणाचे धोरण रद्द करा, विनाअनुदान धोरण रद्द करा आदी मागण्यासंदर्भात अनेकवेळा आंदोलन करण्यात आले असले तरी सरकार नकारात्मक प्रतिसाद देत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष सरकारला दाखविण्यासाठी संप पुकारला आहे. संपात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
७ आॅगस्टपासून संपाचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:34 AM
राज्यसरकारी, जिल्हा परिषद, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी ७ ते ९ आॅगस्ट या कालावधीत लाक्षणिक संप करतील, असा निर्धार जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला.
ठळक मुद्देसभेत निर्णय : कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार नकारात्मक असल्याचा आरोप