आमदारांचे आवाहन : रांगी येथे क्रीडा संमेलनाचे थाटात उद्घाटनधानोरा : देशाला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे उलटली. मात्र गडचिरोली जिल्हा विकासात मागे आहे. याला समन्वय कारणीभूत आहे. त्यामुळे बालक, पालक, शिक्षक, कर्मचारी यांच्या समन्वयातून प्रत्येक गावांचा विकास साधा, असे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले. तालुक्यातील रांगी येथे रविवारी तालुकास्तरीय शालेय बाल क्रीडा व कला संमलेनाचे उद्घाटन पार पडले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स. सभापती कल्पना वड्डे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सदस्य अॅड. गजानन दुगा, सुकमा जांगदुर्वे, केसरी उसेंडी, पं.स. सदस्य अशोक हलामी, परसराम पदा, जयलाल मार्गीया, जास्वंदा करंगामी, जोहरलाल मार्गीया, बशीरभाई पीर, रांगीचे सरपंच जगदिश कन्नाके, उपसरपंच नरेंद्र भुरसे, शशिकांत साळवे, प्रकाश काटेंगे, नारायण हेमके, दिलदारखॉ पठाण, शामराव बोरसरे, रमेश भुरसे, अविनाश महाजन, अनिल पोहणकर, प्राचार्य डी. के. मेश्राम, आश्रमशाळे मुख्याध्यापक मेश्राम, प्रा. राजकुमार शेंडे, मुख्याध्यापिका पालेवार, पोलीस पाटील रामचंद्र काटेंगे, के. जी. नेवारे, संवर्ग विकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, अतिरिक्त बीडीओ कुळसंगे, गट शिक्षणाधिकारी रमेश उचे, विस्तार अधिकारी आखाडे, मडावी, खोब्रागडे, गावडे, सहारे आदी उपस्थित होते. धानोरा तालुक्यातील शाळा व मूत्रीघर बांधकामासाठी आ. डॉ. होळी यांनी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पं.स. सभापती कल्पना वड्डे यांनी यावेळी केली. प्रास्ताविक रमेश उचे, संचालन नरेश बाबोडे तर आभार केंद्रप्रमुख ताडाम यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)१२ केंद्रातील ९६ संघ सहभागी४धानोरा तालुक्यात एकूण १२ केंद्र आहेत. या बाराही केंद्रातील मुलामुलींचे कबड्डी, खो-खो खेळाडूंचे ९६ संघ या तालुकास्तरीय क्रीडा संमेलनात सहभागी झाले आहेत. याशिवाय एका केंद्रातून दोन संघ असे एकूण २४ संघाचे खेळाडू सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. येथे तालुक्यातील शेकडो शिक्षकांनी हजेरी लावली आहे.
सर्वांच्या समन्वयातून गावांचा विकास साधा
By admin | Published: January 04, 2016 3:59 AM