कौसर खान ।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सिरोंचा ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतरण होऊन आता तीन वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र नगर पंचायत प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे सिरोंचा शहराचा विकास पूर्णत: खुंटला आहे. शहराच्या अनेक वॉर्डात नाली, रस्ते, शौचालय व इतर मूलभूत समस्या ऐरणीवर आल्या आहेत. तीन वर्षांच्या कालावधीत येथील सत्ताधाऱ्यांना शासनाकडून अपेक्षित निधी खेचून आणता न आल्याने सिरोंचा शहराची सध्या वाट लागली आहे.सन २०१५ मध्ये सिरोंचा ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर झाले. सिरोंचा व सिरोंचा माल अशा दोन ग्रामपंचायती मिळून नगर पंचायत अस्तित्वात आली. १७ सदस्यीय नगर पंचायतीची निवडणूक होऊन नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती पदावर विराजमान झाले. अनेकांना नगरसेवक पदही मिळाले. ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर शहराचा कायापालट होणार, अशी अपेक्षा शहरवासीयांना होती. मात्र नियोजन शून्यतेमुळे व उदासीनतेमुळे शहराची विकासाकडे वाटचाल होऊ शकली नाही. नगर पंचायतीच्या स्थापनेनंतर प्रथमच प्रशासक म्हणून येथील तत्काली तहसीलदार कुमरे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर मुख्याधिकाºयांची नियुक्ती येथे झाली. मात्र ज्या गतीने शहराचा विकास व्हायला पाहिजे होता, तशी विकासात गती आली नाही.विकास कामांसाठी शासनाकडून निधी खेचून आणणारा तडपदार व कर्तव्यदक्ष पदाधिकारी व नगरसेवकांची गरज असते. मात्र गेल्या तीन वर्षात अशा प्रकारचा निधी खेचून विकास कामांना गती देणारा एकही पदाधिकारी नागरिकांना येथे पाहायला मिळाला नाही.तत्कालीन ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अब्दुल रहीम होते, त्यावेळी कब्रस्थानपर्यंत गिट्टी व मुरूमाच्या सहाय्याने पक्का रस्ता तयार केला होता. त्यानंतर आजपर्यंत विद्यमान कोणत्याही पदाधिकारी व नगरसेवकांनी सदर रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष दिले नाही. आता कब्रस्थानाच्या मार्गावर झुडपी जंगलाचे साम्राज्य पसरले आहे. नगर पंचायतीने या प्रश्नाकडे लक्ष देऊन येथे स्वच्छता करावी, तसेच रस्त्याची दुरूस्ती करावी तसेच नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, सभापती व नगरसेवकांनी विकासाचा ध्यास घ्यावा, अशी मागणी केली आहे.कब्रस्तानाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था, नाली व पक्क्या रस्त्यांचाही अभावशहरातील मुस्लीम कब्रस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. सदर मार्गावर स्ट्रिट लाईटची सुविधा नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी एखाद्या मृत इसमाला दफनविधीसाठी नेताना लोकांना खूप त्रास होतो. मासेमारी करणारे लोक रात्रीच्या वेळेस याच मार्गाने आवागमन करतात. धर्मशाळेच्या मागील बाजूला झुडूपी जंगल मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांपासून नागरिकांना धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या गंभीर समस्येकडे नगर पंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. मन्नेवार वॉर्ड ते सय्यद कॉलनी, प्रभाग क्र.३ मध्ये नाल्यांची सफाई करण्यात आली नाही. तसेच काही ठिकाणी नव्या नाल्यांची गरज असताना सुद्धा नवीन नाली बांधकाम करण्यात आले नाही. प्रभाग क्र.१२, १३, १४ व १७ मध्ये नवीन नाल्यांची निर्मिती करण्यात आली नाही. त्यामुळे अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
नियोजनाअभावी खुंटला सिरोंचा शहराचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 12:37 AM
सिरोंचा ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतरण होऊन आता तीन वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र नगर पंचायत प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे सिरोंचा शहराचा विकास पूर्णत: खुंटला आहे. शहराच्या अनेक वॉर्डात नाली, रस्ते, शौचालय व इतर मूलभूत समस्या ऐरणीवर आल्या आहेत.
ठळक मुद्देअनेक वॉर्डात विविध समस्या ऐरणीवर : नगर पंचायतीच्या दुर्लक्षितपणामुळे सिरोंचावासीयांची होतेय ससेहोलपट