शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

गडचिरोली नगर परिषदेतील विकास कामे मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 10:59 PM

गडचिरोली शहरातील बहुप्रतीक्षित विकास कामांचे प्रस्ताव मार्गी लागण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांनी भरीव निधी देण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत. त्यामुळे शहरातील विकास कामे मार्गी लागण्याची आशा बळावली आहे.

ठळक मुद्देनिधी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश : नवी पाणीपुरवठा योजना, नाट्यगृह मार्गी लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली शहरातील बहुप्रतीक्षित विकास कामांचे प्रस्ताव मार्गी लागण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांनी भरीव निधी देण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत. त्यामुळे शहरातील विकास कामे मार्गी लागण्याची आशा बळावली आहे.गडचिरोली नगर परिषदेच्या विविध कामांसाठी भरीव निधी देण्याची मागणी याआधीच मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. मंगळवारी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह नगराध्यक्ष योगीता पिपरे, नगरसेवक प्रमोद पिपरे, भाजपचे जिल्हा महामंत्री रविंद्र ओल्लालवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची मुंबईत भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रस्ताव तत्काळ मार्गी लावून निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.राज्य सरकारचा कार्यकाळ संपण्यासाठी अवघे काही महिने शिल्लक आहेत. निवडणुकीची आचारसंहिता दीड महिन्यात लागणार आहे. त्यामुळे शक्य तितकी कामे मंजूर करून निधी देण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक भूमिका घेत आहे. आता ही कामे कधी मार्गी लागतील आणि त्याचा गडचिरोलीकरांना कधी लाभ घेता येईल, याकडे शहरवासियांचे लक्ष राहणार आहे.असे आहेत कामांचे प्रस्तावशहरातील प्रस्तावित कामांमध्ये गडचिरोली नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीकरिता २५ कोटी, शहर सौंदर्यीकरण व रस्ते विकास कामासाठी १५ कोटी, शहरातील नवीन पाणी पुरवठा योजनेकरीता ४५ कोटी रु पये आणि नवीन नाट्यगृहासाठी २० कोटी रुपये दिले जाणार आहेत.घनकचरा व्यवस्थापनासाठी नगर पंचायतींना निधीस्वच्छ भारत अभियानांतर्गत एटापल्ली, भामरागड, चामोर्शी, अहेरी नगर पंचायती व आरमोरी नगर परिषदेला कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी)च्या धरतीवर महाराष्ट्र शासनाने स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी सुरू केली आहे. या अभियानांतर्गत शहरे हागणदारीमुक्त करणे व घनकचरा व्यवस्थापनांतर्गत स्वच्छता राखणे, घनकचरा व्यवस्थापन करणे या दोन मुख्य घटकांचा समावेश आहे.१ मार्च २०१९ रोजी स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या बैठकीत १२३ नगर पंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन नमुना प्रकल्पाच्या अहवालास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार नगर पंचायतींना निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये एटापल्ली नगर पंचायतीला ७८ लाख, भामरागड नगर पंचायतीला ६८.९६ लाख, चामोर्शी नगर पंचायतीला ९५.७६ लाख, अहेरी नगर पंचायतींला १०४.८३ लाख, आरमोरी नगर परिषदेला १३६.२५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारावा, असे निर्देश संबंधित नगर पंचायती व नगर परिषदांना देण्यात आले आहे.