शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मार्कंडेश्वर मंदिरात भाविकांच्या दर्शनाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 05:00 IST

विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेले मार्कंडा देवस्थान अखेर भक्तांसाठी खुले करण्यात आले. मार्कंडेश्‍वराचे दर्शन घेणाऱ्या भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने तहसील कार्यालय किंवा मार्कंडा देवस्थान मार्गावरील  पोलीस चौकीत आपल्या नावाची नोंदणी करून दर्शनासाठी आपले नाव निश्चित करावे, असे आवाहन आ.डॉ. होळी यांनी भाविकांना केले आहे. 

ठळक मुद्देप्रत्यक्ष आणि ऑनलाईन बुकींगची साेय

लाेकमत न्यूज नेटवर्कमार्कंडादेव : चामाेर्शी तालुक्यातील प्रसिद्ध मार्कंडा देवस्थान शनिवारी भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. दरराेज ५०० भाविकांना टाेकनच्या माध्यमातून दर्शन घेता येणार आहे. हे दर्शन सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम आ.डॉ. देवराव होळी यांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले.विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेले मार्कंडा देवस्थान अखेर भक्तांसाठी खुले करण्यात आले. मार्कंडेश्‍वराचे दर्शन घेणाऱ्या भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने तहसील कार्यालय किंवा मार्कंडा देवस्थान मार्गावरील  पोलीस चौकीत आपल्या नावाची नोंदणी करून दर्शनासाठी आपले नाव निश्चित करावे, असे आवाहन आ.डॉ. होळी यांनी भाविकांना केले आहे. दर्शनासाठी गडचिरोली जिल्ह्यातूनच नव्हे, तर विदर्भाच्या अनेक भागांतून भाविक महाशिवरात्रीला येत असतात. परंतु, यावर्षी प्रशासनाने दर्शनासाठी बंदी घातल्याने शिवभक्तांमध्ये नाराजी पसरली आहे. आ. डॉ. होळी यांनी राज्य शासन व प्रशासनाचा निषेध करीत आंदोलनाचा इशारा दिला होता, त्याचा सकारात्मक परिणाम होऊन प्रशासनाच्या वतीने मंदिर शनिवारी सकाळपासून दर्शनासाठी खुले करण्यात आले. त्या अनुषंगाने डॉ. होळी यांनी देवस्थानात प्रथम पूजन करून दर्शन घेतले. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, भाजप तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, भाजप बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, भाजप तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे, जयराम चलाख उपस्थित होते.

राेजगार अन् उत्साह देखील हिरावलाविदर्भात प्रसिध्द असलेल्या मार्कंडादेव येथे दरवर्षी महाशिवरात्रीला एकदाच माेठी जत्रा भरते. या परिसरातील छाेटेमाेठे विक्रेते, भाविक व सर्व स्तरातील नागरिक या जत्रेची वर्षभरापासून प्रतीक्षा करीत असतात. पूजा-अर्चेसाेबतच मनाेरंजनही हाेते. मात्र यावर्षी काेराेनाने मार्कंडाची जत्रा रद्द झाली. एकही दुकान लागले नाही. परिणामी राेजगार हिरावला. तसेच उत्साह सुध्दा मावळला. 

१३६ भाविकांनी घेतले दर्शनचामोर्शी : कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मार्कंडा येथील मार्कंडेश्वर मंदिरात १३ मार्चपासून भाविकांना प्रशासनाकडून टोकन पद्धतीने दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार शनिवारी १३६ भाविकांनी या पद्धतीने मार्कंडेश्वराचे दर्शन घेतले. माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनीही दर्शन घेतले. याशिवाय दि.१४ साठी १३७ आणि दि.१५ साठी ३८ टोकनची बुकिंग झाल्याचे चामोर्शी तहसील प्रशासनाने सांगितले. सामान्य भाविकांची भावना लक्षात घेऊन अखेर दररोज टोकन पद्धतीने ५०० भाविकांना मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. 

 

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिरDevrao Holiदेवराव होळी