लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार पुरविण्यात धानोरा तालुक्याने अव्वल स्थान पटकाविले असून या तालुक्याने २०१९-२० या आर्थिक वर्षात २३ फेब्रुवारीपर्यंत सुमारे २ लाख ४८ हजार २७७ मनुष्यदिवस रोजगार उपलब्ध करून दिला आहे.गडचिरोली जिल्ह्यात उद्योग नसल्याने येथील मजूर शेतीवर अवलंबून राहतात. शेतीच्या माध्यमातून जवळपास चार महिन्याचा रोजगार उपलब्ध होते. त्यानंतर मात्र रोजगार हमी योजनेच्या कामांवर अनेक मजूर जातात. त्यामुळे रोजगार हमी योजनेच्या कामांचे ग्रामीण भागातील नागरिकांना विशेष महत्त्व आहे. गावात रोजगार हमी योजनेचे काम सुरू असेल तर कामगार दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात कामासाठी जात नाही. मात्र काम बंद असेल तर स्थलांतर करावे लागते. चामोर्शी हा जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला व मोठा तालुका आहे. मात्र या तालुक्याने रोजगार हमी योजनेंतर्गत केवळ १ लाख ७० हजार ९६८ दिवस रोजगार पुरविला आहे. त्यापेक्षा लहान तालुका असलेल्या देसाईगंज तालुक्यानेही चामोर्शी तालुक्याला मागे टाकत १ लाख ७१ हजार ९१० मनुष्य दिवस रोजगार पुरविला आहे. मागील चार वर्षांच्या तुलनेत रोजगार हमी योजनेंतर्गत मिळणारा रोजगार घटत चालला आहे. नेमक्या कोणत्या कारणामुळे रोजगार हमी योजनेतून निर्माण होणारा रोजगार घटत चालला आहे याचा शोध घेण्याची गरज आहे.अधिकार असूनही मागणी होत नाहीरोहयोचे जॉबकार्डधारक प्रत्येक कुटुंबाला वर्षातून १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मागणी करूनही रोजगार उपलब्ध न झाल्यास संबंधित कुटुंबाला बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद रोजगार हमी योजनेच्या कायद्यात आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील मजुरांमध्ये याबाबत जागृती नसल्याने स्वत:हून रोजगाराची मागणी करीत नाही. काम सुरू असेल तरच कामावर जातात, अशी स्थिती आहे.
रोहयो कामांमध्ये धानोरा अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 6:00 AM
गडचिरोली जिल्ह्यात उद्योग नसल्याने येथील मजूर शेतीवर अवलंबून राहतात. शेतीच्या माध्यमातून जवळपास चार महिन्याचा रोजगार उपलब्ध होते. त्यानंतर मात्र रोजगार हमी योजनेच्या कामांवर अनेक मजूर जातात. त्यामुळे रोजगार हमी योजनेच्या कामांचे ग्रामीण भागातील नागरिकांना विशेष महत्त्व आहे. गावात रोजगार हमी योजनेचे काम सुरू असेल तर कामगार दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात कामासाठी जात नाही.
ठळक मुद्देभामरागड, एटापल्ली मागे : रोजगार घटला