गडचिराेली : वाहनांच्या वाढत्या संख्येबराेबरच अपघातांची संख्या वाढत चालली आहे. जानेवारी ते जून या जेमतेम सहा महिन्यांच्या कालावधीत सुमारे ५९ जणांचा जीव गेला आहे, तर ८४ जण गंभीर, तर ३२ जण किरकाेळ जखमी झाले आहेत.
मागील काही वर्षांत दुचाकी, चारचाकी व मालवाहू वाहनांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढली आहे. त्या तुलनेत रस्ते रुंद करण्यात आले नाहीत, तसेच रस्त्यांची वेळाेवेळी दुरुस्ती केली जात नाही. वाहनधारक वाहन चालविण्याचे नियम पाळत नाही. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. काेराेनाच्या महामारीत काेराेनामुळे अनेकांचा जीव गेला. त्याचबराेबर अपघातामुळेही अनेकांना प्राण गमवावा लागला आहे. १५ एप्रिल ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काेराेनामुळे लाॅकडाऊन हाेते, तर जानेवारी ते एप्रिलपर्यंत काेणतीही बंधणे नव्हती. मात्र, या कालावधीत ५९ जणांचा जीव गेला आहे. यामध्ये ५० पुरुष व ९ महिलांचा समावेश आहे. जखमी झालेल्यांमध्ये ८९ पुरुष व २७ महिलांचा समावेश आहे.
बाॅक्स....
लाॅकडाऊनमध्ये अपघात कमी
काेराेनामुळे १५ एप्रिल ते १ जूनपर्यंत लाॅकडाऊन हाेता. या कालावधीत केवळ मालवाहू वाहनांना परवानगी देण्यात आली हाेती, तसेच आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडता येत हाेते. या कालावधीत जिल्ह्यात शेकडाे नागरिकांचा काेराेनामुळे मृत्यू झाला. या कालावधीत लग्नसमारंभ बंद हाेते. जिल्हाबंदी हाेती. त्यामुळे नागरिक घराबाहेर पडत नव्हते. त्यामुळे अपघात कमी झाले.
बाॅक्स...
पायी चालणाऱ्यांनाही धाेका
पायी चालणाऱ्या व्यक्ती रस्त्याच्या बाजूने चालतात. त्यांना वाहनाने धडक दिल्यानेसुद्धा मृत्यू झाले आहेत. विशेष करून सकाळच्या सुमारास फिरायला जाणाऱ्या व्यक्तींचा जीव गेला आहे. त्यामुळे राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गावर पायी जातानाही धाेका आहे.
बाॅक्स...
मृतकांमध्ये सर्वाधिक तरुणांचा समावेश
तरुणांमध्ये दुचाकी वाहने वेगाने चालविण्याची क्रेेझ आली आहे. विविध कंपन्यांची सुसाट वेगाने पळणारी वाहने उपलब्ध आहेत. तरुण वर्ग अशी वाहने खरेदी करण्यास पसंती दर्शवितात. त्यामुळे युवक अपघाताचे सर्वाधिक बळी ठरत आहेत.
बाॅक्स...
या ठिकाणी वाहने हळू चालवा
मार्ग चांगला असल्यास अतिशय वेगात वाहन चालविले जाते. जिल्ह्यात काही ठिकाणी वळण आहेत. वळणामुळे समाेरचे वाहन अगदी जवळ आल्याशिवाय दिसत नाही, तसेच आपले वाहन वळवितेवेळी ते उजव्या बाजूला जाते. अशावेळी दाेन वाहनांची धडक हाेऊन अपघात घडले आहेत. त्यामुळे वळणाच्या ठिकाणी वाहनाचा वेग कमी असणे आवश्यक आहे.
बाॅक्स...
वेळ मौल्यवान, पण जीवन अमूल्य !
काही नागरिकांना अतिशय वेगाने वाहन चालविण्याची सवय असते. जेवढ्या वेगाने वाहन धावेल तेवढाच अपघाताचा धाेका वाढतो. त्यामुळे वाहन शक्यताे हळू चालवावे. मालवाहू वाहनसुद्धा वेगाने चालवू नये.
- संदीप डाेईजड, युवक
.....................
काेणतेही काम असल्यास वेळेपूर्वी निघाल्यास हळुवार पाेहाेचता येते. मात्र, काही नागरिक अगदी वेळेवर घरून निघतात. इच्छितस्थळी पाेहाेचण्यासाठी वाहनाचा वेग वाढविला जातो, हे धाेकादायक आहे.
- मयूर येरमे, युवक
बाॅक्स...
वर्ष जखमी मृत्यू
२०१८ ३२१ १५६
२०१९ २९३ १३२
२०२० २४२ १४२
२०२१ ११६ ५९