लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : निराधारांना संजय गांधी योजनेंतर्गत दरमहा अर्थसहाय्य अनुदान दिले जाते. धानोरा तालुक्यात अनेक लोकांना अनुदानाचे वाटप केले जाते. परंतु मागील तीन महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने योजनेचे लाभार्थी बँकेत हेलपाटे मारत आहेत.संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेंतर्गत अंध, अपंग, मतिमंद, सिकलसेलग्रस्त, कर्णबधीर, हत्तीरोग, कुष्टरोग, निराधार वृद्ध, विधवा परित्यक्ता, देवदासी महिला, अनाथ बालके आदींना लाभ दिला जातो. प्रति माह १००० रूपये अनुदान लाभार्थ्यांना दिले जाते. परंतु धानोरा तालुक्यातील लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नाही.अनुदान जमा होत नसल्याने लाभार्थ्यासमोर आर्थिक अडचण आहे. दसरा व दिवाळी सण सुद्धा पैशाशिवाय जाईल की काय, अशी शंका लाभार्थ्यांमध्ये आहे. धानोरा तालुक्याच्या दुर्गम भागातून लाभार्थी धानोरा येथे आर्थिक व्यवहार करण्याकरिता येत आहेत. परंतु अनुदान बँक खात्यात जमा न झाल्याची माहिती मिळताच त्यांना आल्यापावली परत जावे लागत आहे. यात त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तीन महिन्याचे अनुदान त्वरित द्यावे, अशी मागणी दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रकाश मारभते, पुंडलिक लोणारे, ताराबाई मडावी, प्रकाश जेंगठे, दिवाकर मेश्राम, कविता सोनुले, वसंत गुरनुले, रामजी नैताम, रमेश नरचुलवार, कमान वाघाडे, अतुल शिंपी यांनी केली आहे.बँकेमध्ये लाभार्थ्यांची गर्दीयंदा अतिवृष्टीमुळे शेतातील धान व अन्य पिकाचे प्रचंड नुकसान झाले. तसेच शेती हंगामात शेतकऱ्याने बराचसा पैैसा खर्च केला. तसेच दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने वातावरणातील बदलामुळे विविध आजारांचा प्रसार होण्याची शक्यता आहे. तालुक्यात अनेक गावात आजारांची साथ आहे. अशा स्थितीत उपचार करण्याकरिता पैशांची आवश्यकता लाभार्थ्यांना आहे. पैसे काढण्यासाठी निराधार योजनेचे लाभार्थी बँकेत वारंवार हेलपाटे मारून अनुदान जमा झाले की नाही, याची खात्री करीत आहेत.
अनुदान रखडल्याने अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 12:35 AM
निराधारांना संजय गांधी योजनेंतर्गत दरमहा अर्थसहाय्य अनुदान दिले जाते. धानोरा तालुक्यात अनेक लोकांना अनुदानाचे वाटप केले जाते. परंतु मागील तीन महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने योजनेचे लाभार्थी बँकेत हेलपाटे मारत आहेत. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेंतर्गत अंध, अपंग, मतिमंद, सिकलसेलग्रस्त, कर्णबधीर, हत्तीरोग, कुष्टरोग, निराधार वृद्ध, विधवा परित्यक्ता, देवदासी महिला, अनाथ बालके आदींना लाभ दिला जातो. प्रति माह १००० रूपये अनुदान लाभार्थ्यांना दिले जाते. परंतु धानोरा तालुक्यातील लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नाही.
ठळक मुद्देतीन महिने उलटले : धानोरा तालुक्यातील निराधारांचे हेलपाटे