लोकमत न्यूज नेटवर्ककमलापूर : कमलापूर येथील हत्ती कॅम्पमधील हत्तींची संख्या आता १० वर पोहोचली आहे. मात्र हत्तींच्या देखभालीसाठी पाहिजे तेवढा मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने हत्तींची गैरसोय होत आहे, असा आरोप विदर्भ वनकामगार संघटनेचे अध्यक्ष रमेशचंद्र दहिवडे यांनी केला आहे.कमलापूर येथे बसंती, रूपा, अजित, मंगला, राणी, गणेश, प्रियंका, आदित्य, सई व मकर संक्रांतीच्या दिवशी जन्माला आलेला अर्जुन असे एकूण १० हत्ती आहेत. हत्तींची जोपासना करण्यासाठी एका हत्तीच्या मागे एक महावत, एक चारा कटर अशी दोन पदे आवश्यक आहेत. कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्ये १० हत्ती आहेत. त्यानुसार १० माहुत व १० चारा कटरची गरज आहे. मात्र केवळ तीन माहुत व एकच चारा कटर आहे. माहुत हत्तींना प्रशिक्षण देण्याचे काम करते. तर चारा कटर हत्तींसाठी चाऱ्याची व्यवस्था व त्यांची देखभाल करण्याचे काम करते. हत्ती हा मोठा प्राणी असल्याने त्याला मोठ्या प्रमाणात चाऱ्याची गरज भासते. त्यामुळे एका हत्तीच्या मागे किमान एक चारा कटर असणे आवश्यक आहे. मात्र या ठिकाणी १० हत्तींसाठी एकच चारा कटर असल्याने हत्तींना पाहिजे त्या प्रमाणात चारा मिळत नाही. त्याचबरोबर कार्यरत कर्मचाºयावरही कामाचा भार अधिक आहे. वनविभागाने माहुत व चारा कटरच्या जागा भराव्या, अशी मागणी दहिवडे यांनी केली आहे.कमलापूर येथील हत्ती गडचिरोली जिल्ह्याचे आभूषण आहे. त्यामुळे त्यांची चांगल्या पद्धतीने देखभाल करणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस कमलापूर हत्ती कॅम्पला भेट देणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. याठिकाणी सोयीसुविधा निर्माण केल्यास पर्यटकांची संख्या आणखी वाढू शकते. मात्र शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. कमलापूरसह ताडोबा, मेळघाट या ठिकाणी सुद्धा हत्ती आहेत. मात्र महावत व चारा कटरची पदे रिक्त आहेत. रोजंदारी कामगारांच्या भरवशावर काम चालविले जात आहे.
कर्मचाऱ्यांच्या कमतरतेने हत्तींची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:09 AM
कमलापूर येथील हत्ती कॅम्पमधील हत्तींची संख्या आता १० वर पोहोचली आहे. मात्र हत्तींच्या देखभालीसाठी पाहिजे तेवढा मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने हत्तींची गैरसोय होत आहे, असा आरोप विदर्भ वनकामगार संघटनेचे अध्यक्ष रमेशचंद्र दहिवडे यांनी केला आहे.
ठळक मुद्देकॅम्पला भेट देणाऱ्यांची संख्या वाढली : १० हत्तींसाठी केवळ तीन माहुत व एक चारा कटर