प्रवचन मालिकेच्या शुभारंभप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस तुलाराम राऊत, कार्यालयीन सचिव प्रा. गौतम डांगे, कोषाध्यक्ष मोरेश्वर अंबादे, उपाध्यक्ष लहुजी रामटेके, शहर अध्यक्ष बाळकृष्ण बांबोळे तसेच बौद्ध समाज मंडळाचे अध्यक्ष वसंतराव बाबनवाडे उपस्थित होते. महासभेचे सरचिटणीस तुलाराम राऊत यांनी ‘भारतीय बौद्ध महासभेची रचना आणि कार्यपद्धती’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यालयीन सचिव प्रा. गौतम डांगे यांनी ‘बौद्ध धर्मात बुद्धविहाराचे महत्त्व’ या विषयावर प्रबोधन केले. बुद्धविहार ही केवळ इमारत नसून माणसाला सन्मार्गाला नेणाऱ्या मानवजातीसाठी ऊर्जा देणारे, दुःख मुक्तीचा मार्ग दाखवणारे आणि धम्म संस्काराचे केंद्र आहे. त्यामुळे या विहारात होणाऱ्या प्रबोधनाचा प्रत्येकाने लाभ घेऊन तथागत गौतम बुद्धांचे समतेचे विचार अंगीकारावे व धम्म चळवळ अधिक गतिमान करावी, असे आवाहन केले. याप्रसंगी उपासिकांनी सामूहिक बुद्धवंदना घेतली. यावेळी प्रदीप जनबंधू, पी. डी. गायमुखे, सीमा खोब्रागडे, सुजाता रोडगे, प्रमिला गायमुखे, विद्या टेकरे, रेखा मेश्राम, कविता शेंडे उपस्थित हाेते. संचालन कोषाध्यक्ष मोरेश्वर अंबादे, तर उपस्थितांचे आभार प्रशांत खोब्रागडे यांनी मानले. सरणत्तय घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
श्रावस्ती बुद्धविहारात वर्षावासानिमित्त प्रवचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 4:40 AM