लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०१९ यावर चर्चासत्र घेण्यात आले.यावेळी अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.व्ही. कल्याणकर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी व विशेष अतिथी म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. चंद्रशेखर भुसारी उपस्थित होते. याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०१९ ची मांडणी उपस्थितांसमोर व्यवस्थितपणे मांडून नवीन शैक्षणिक धोरण हे भारताला महासत्ता बनविण्यासाठी कसे महत्त्वाचे ठरेल याबद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर सभागृहामध्ये प्रश्नोत्तराच्या माध्यमातून चर्चा झाली. त्यामध्ये अनेक मान्यवरांच्या शंकांचे निरासन करून त्यांच्या सुचनांची नोंद घेण्यात आली.अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. कल्याणकर यांनी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काही सूचना सुचविल्या ज्यामध्ये देशातील सर्व राज्यांमध्ये शैक्षणिक धोरण समान असावे, जे की राज्यनिहाय्य वेगवेगळे असून नये हे सर्वसमावेशक, ज्ञाननिर्मित आणि न्यायरक असावे व काही मुद्यांचे स्वागत केले. गुणात्मक शिक्षण ही काळाची गरज आहे, असे मत त्यांनी मांडले. कार्यक्रमाला विद्यापीठाचे संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे डॉ. अनिल चिताडे तसेच विद्यापीठ प्राधिकारणाचे सदस्य, अधिष्ठाता, प्राध्यापक, अधिकारी उपस्थित होते. संचालन प्रा. शिवाजी चेपटे तर आभार डॉ. रजनी वाढई यांनी मानले.
विद्यापीठात शैक्षणिक धोरणावर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 10:16 PM
गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०१९ यावर चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.व्ही. कल्याणकर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी व विशेष अतिथी म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. चंद्रशेखर भुसारी उपस्थित होते.
ठळक मुद्देतज्ज्ञांनी मांडले मत : गुणवत्ता वाढीसाठी सूचविल्या सूचना