लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागड येथील समूह निवासी शाळेला आंतरराष्ट्रीय स्तरावरील शाळेचा दर्जा देण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मूल्यांकन पथक भामरागड येथे ६ फेब्रुवारी रोजी दाखल झाले. या पथकाने शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.राज्यात १०० जिल्हा परिषद शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाने १४ आॅक्टोबर २०१६ रोजी शासन निर्णय काढला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील शाळा निर्मितीसाठी महाराष्ट्र विद्या प्राधिकरण पुणेमार्फत लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. भामरागडच्या गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवाने यांच्या मार्गदर्शनात समूह निवासी शाळेची लिंक भरण्यात आली. त्यानंतर समूह निवासी शाळेतील सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, सर्व पदाधिकारी व शिक्षक यांची सिंहगड येथे कार्यशाळा संपन्न झाली. ६ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय शाळा मूल्यांकन पथकातील अमरावती डीआयईसीपीडीचे ज्येष्ठ अधीव्याख्याता प्रशांत डवरे, एस.सी.ई.आर.टी.चे राज्य सल्लागार प्रतीक राजुरकर, गडचिरोली डीआयईसीपीडीचे विषय सहायक नीलकंठ शिंदे यांनी शाळेला भेट देऊन शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांसोबत चर्चा केली. शिक्षकांकडून प्रश्नावली भरून देण्यात आली. यावेळी केंद्रप्रमुख गुरूदास गोमासे, विषय साधन व्यक्ती चांगदेव सोरते, घनश्याम वांढरे, धनीराम तुलावी, विशेष तज्ज्ञ कैलास जगने, अली पठाण, मुख्याध्यापक अवथरे, शिक्षक किशोर मोडक यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शंकर महाका, चैतू गावडे, शरिफा पठाण आदी उपस्थित होते.जिल्ह्यात किमान एकतरी आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा असणे आवश्यक आहे.त्यामुळे भामरागड येथील समूह निवासी शाळेला आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा देऊन या ठिकाणी शासनाने सर्व शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशी अपेक्षा पालक करीत आहेत.
आंतरराष्ट्रीय शाळा निर्मितीसाठी मूल्यांकन पथकातर्फे चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 11:45 PM
भामरागड येथील समूह निवासी शाळेला आंतरराष्ट्रीय स्तरावरील शाळेचा दर्जा देण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मूल्यांकन पथक भामरागड येथे ६ फेब्रुवारी रोजी दाखल झाले. या पथकाने शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
ठळक मुद्देभामरागडात चमू दाखल : सर्व सुविधांनी युक्त राहणार शाळा