लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने देसाईगंज येथे गुरूवारी जिल्हास्तरीय मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात पोलीस पाटलांच्या अनेक समस्यांवर चर्चा करून त्यांचा शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले. याप्रसंगी सेवानिवृत्त पोलीस पाटलांचा सत्कार करण्यात आला.मेळाव्याचे उद्घाटन आ.कृष्णा गजबे यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी संघटनेचे कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर होते. मार्गदर्शक म्हणून नगराध्यक्ष शालू दंडवते, भाजपचे भंडारा जिल्हा संघटनमंत्री दिलीप चित्रीव, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद ब्राह्मणवाडे, मुरारी दहिकार, सुधाकर साठवणे, विजय घाडगे, दिलीप मेश्राम, आनंदराव गंडाटे, किशोर तिडके, यशवंत इरदंडे, यशोधरा नंदेश्वर, नंदा ठाकरे, अनिता लंजे उपस्थित होत्या.राज्यातील पोलीस पाटलांचे मानधन ६ हजार ५०० रूपये करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करण्याकरिता सदर मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात आ.कृष्णा गजबे व संघटनेचे प्रतिनिधी भृंगराज परशुरामकर, सेवानिवृत्त पोलीस पाटील श्रीराम राऊत यांचा सत्कार करण्यात आला. पोलीस पाटलांसाठी सेवानिवृत्ती योजना लागू करणे, सेवानिवृत्तीचे वय वाढविणे, अनुकंपा योजना लागू करणे आदी मागण्या मार्गी लावाव्या, अशी मागणी पोलीस पाटलांनी केली. प्रास्ताविक शरद ब्राह्मणवाडे, संचालन गणेश वनवे तर आभार सुरेश मत्ते यांनी मानले. यावेळी चार जिल्ह्यातील पोलीस पाटील उपस्थित होते.
पोलीस पाटलांच्या समस्यांवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 1:31 AM
गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने देसाईगंज येथे गुरूवारी जिल्हास्तरीय मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात पोलीस पाटलांच्या अनेक समस्यांवर चर्चा करून त्यांचा शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले. याप्रसंगी सेवानिवृत्त पोलीस पाटलांचा सत्कार करण्यात आला.
ठळक मुद्देदेसाईगंज येथे मेळावा : सेवानिवृत्त पोलीस पाटलांचा सत्कार