बैठकीला भामरागडचे तहसीलदार अनमोल कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, नगर पंचायत मुख्याधिकारी सूरज जाधव, प्रभारी अधिकारी मंगेश, कराडे, पोलीस उपनिरीक्षक संघमित्र बांबोळे, तालुका आराेग्य अधिकारी डॉ. मिलिंद मेश्राम, डॉ. भावेश वानखेडे, न.पं कर निर्धार अधिकारी आशिष बारसागडे आदी उपस्थित हाेते. सर्व व्यापारी सोमवार, ५ एप्रिलपासून कोविड टेस्ट करून घेतील, वय वर्षे ४५ वरील सर्व नागरिकांनी लस घ्यावी, मास्कचा वापर करणे, शारीरिक अंतर ठेवणे, तसेच गर्दी टाळण्यासाठी सहकार्य सर्वजण करतील, बुधवारी आठवडी व सर्वानुमते दैनंदिन बाजारसुद्धा बंद राहील, नियम ताेडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल आदी सूचना करून सर्वांनी नोंद घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे व्यापाऱ्यांना सांगण्यात आले. या बैठकीत जवळपास ९० व्यापारी व नागरिक उपस्थित होते.
काेविड उपाययाेजनांबाबत व्यावसायिकांच्या बैठकीत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2021 4:32 AM