या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष कुलपती मेश्राम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, जेष्ठ नेते बंडू मशाखेत्री, जिल्हा सरचिटणीस हंसराज उंदिरवाडे, जिल्हा उपाध्यक्ष दुर्योधन सहारे, जिल्हा सचिव अशोक खोब्रागडे, आदिवासी आघाडीचे जिल्हा प्रमुख पुणेश वड्डे उपस्थित होते. या बैठकीत पक्ष संघटनेबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीत पक्षसंघटना ग्रामस्तरावर मजबूत करून आगामी निवडणुकीसाठी तयार राहण्याचे ठरविण्यात आले. जनतेच्या समस्या शासनापुढे मांडण्यासाठी पक्षातर्फे आंदोलन करण्याबाबतही चर्चा झाली. याप्रसंगी रिपब्लिकन पक्षाची धानोरा तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली .
यामध्ये रमेश बारसागडे यांची अध्यक्षपदी तर कमलेश राऊत यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. उपाध्यक्ष - वासुदेव चौधरी, ज्ञानदेव वासनिक, अरूण सेकृतीवार, सहसचिव रजत मशाखेत्री, कोषाध्यक्ष रूपेश गेडाम, संघटक गिरीधर बारसागडे, सदस्य भानुदास बांबोळे, गुणवंत खोब्रागडे तर धानोरा शहर अध्यक्षपदी राजू मशाखेत्री यांची निवड जाहीर करण्यात आली. सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.