लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी गडचिरोली नगर परिषदेमार्फत शहरातील मुख्य सार्वजनिक ठिकाणी अग्निशमन वाहनाच्या मदतीने सोडियम हायपोक्लोराईड व पाण्याच्या मिश्रणाची फवारणी करण्यास सुरूवात केली आहे.नगर परिषदेने कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी स्वच्छता व फवारणीवर भर दिला आहे. यासाठी ३६ लाख रूपयांची तरतुद केली आहे. १४ व्या वित्त आयोगाचा ३ कोटी रूपयांचा निधी नगर परिषदेकडे उपलब्ध आहे. त्यापैकी ३६ लाख रूपयांमधून सॅनिटायझर, मनुष्यबळ व फवारण्यांसाठी आवश्यक असलेली रसायने खरेदी केली जाणार आहेत. सदर खर्चाला परवानगी द्यावी, यासाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला आहे. या निधीतून पुढील तीन महिन्यांसाठी उपाययोजना केली जाणार आहे.जिल्ह्यात सद्यस्थितीत एकही कोरोनाग्रस्त आढळला नसला तरी देशभरात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गडचिरोली नगर परिषदेमार्फत सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी केली जात आहे. ५ हजार लिटर क्षमतेच्या अग्निशमन वाहनाच्या टँकमध्ये ८० लिटर सोडियम हायपोक्लोराईड टाकले जात आहे. पाणी व सोडियम हायपोक्लोराईडचे हे मिश्रण फवारणी केले जाते.कोरोनाची साथ संपेपर्यंत हा उपक्रम दरदिवशी चालू ठेवण्याचा निर्णय नगर परिषदेने घेतला आहे. नगर परिषदेचे वरिष्ठ फायरमन केशव सातपुते, वाहन चालक धनराज गुरू, जगन्नाथ चिंचोळे, फायरमन मंगेश मैंदुरकर, संजय कुमरे, संजय बोलीवार, मदतनीस दर्शन कुकुडकर, अविनाश तिराणिक, विकेश सोनटक्के, विनोद वाढई हे मदत करीत आहेत.याशिवाय फॉगिंग मशीनच्या सहाय्याने बॅक्टीसिड बॉयोलॉजीकल पावडरची फवारणी केली जात आहे. नवीन वस्त्यांमध्ये फवारणी करण्यावर भर दिला जात आहे. साध्या स्प्रे पंपाच्या सहाय्याने शहरातील नाल्यांमध्ये जंतूनाशकांची फवारणी केली जात आहे. यासाठी १० कर्मचारी कामाला लावण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन अलर्ट झाले असून खबरदारी घेतली जात आहे.गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी फवारणीगडचिरोली शहरातील महिला व बाल रूग्णालय, जिल्हा सामान्य रूग्णालय, पोलीस स्टेशन, इंदिरा गांधी चौक, नगर परिषद कार्यालय, आठवडी बाजार, दैनिक गुजरी, जिल्हाधिकारी कार्यालय, एसपी आॅफिस, जिल्हा परिषद, एलआयसी आॅफिस, बसस्थानक, आयटीआय, पंचवटी नगर ही प्रामुख्याने सार्वजनिक ठिकाणे आहेत. या ठिकाणी विविध कामांसाठी नागरिक ये-जा करतात. त्यामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कोरोनाचे विषाणू या भागात राहण्याची शक्यता राहते. त्या विषाणूंना नष्ट करण्यासाठी सोडियम हायपोक्लोराईड व पाण्याचे मिश्रण फवारले जात आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहराचे निर्जंतुकीकरण करण्यावर विशेष भर दिला जात आहे. यासाठी नगर परिषदेने आर्थिक तरतुदसुद्धा केली आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणे ही नगर परिषदेची जबाबदारी आहे. मात्र वैयक्तिक स्वच्छताही नागरिकांनी पाळावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी शारीरिक अंतर वाढवून मनातले अंतर कमी करावे. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.- संजीव ओहोळ, मुख्याधिकारी,नगर परिषद गडचिरोली
सार्वजनिक ठिकाणांचे निर्जंतुकीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 5:00 AM
नगर परिषदेने कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी स्वच्छता व फवारणीवर भर दिला आहे. यासाठी ३६ लाख रूपयांची तरतुद केली आहे. १४ व्या वित्त आयोगाचा ३ कोटी रूपयांचा निधी नगर परिषदेकडे उपलब्ध आहे. त्यापैकी ३६ लाख रूपयांमधून सॅनिटायझर, मनुष्यबळ व फवारण्यांसाठी आवश्यक असलेली रसायने खरेदी केली जाणार आहेत. सदर खर्चाला परवानगी द्यावी, यासाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला आहे.
ठळक मुद्देनगर परिषदेचा उपक्रम : सोडियम हायपोक्लोराईडच्या मिश्रणाची फवारणी