शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: ठाकरे गटाच्या गटांगळ्या! ठाणे-कोकणच्या गडाला खिंडार, शिंदेसेनेपुढे जिंकला फक्त एक आमदार
2
Baramati Vidhan Sabha Election Result 2024 Live : बारामतीचे 'दादा' अजित पवारच! पुतण्याला चितपट करत साकारला ऐतिहासिक विजय
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "बहि‍णींनी असा अंडर करंट दाखवला की सगळे उताणे पडले"; विजयानंतर अजित पवारांचा टोला
4
'ओ स्त्री! रक्षा करना', राजकारणातील सर्वाधिक पावरफुल मंत्र ठरला; एकामागोमाग एक सरकारे वाचली
5
मालाड पश्चिममध्ये अस्लम शेख यांच्याकडून आशिष शेलारांच्या भावाचा पराभव; सलग चौथ्यांदा विजय
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महायुतीचा मुख्यमंत्री कोण?; खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच दिलं सगळ्यांच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर
7
Yevla Vidhan Sabha Election Result 2024 Live : छगन भुजबळांनी येवल्याचा गड राखला; २६०५८ मतांनी विजयी, शिंदे पराभूत 
8
Maharashtra Assembly Election Result 2024: वर्सोव्यात शिवसेना उबाठाच्या हारुन खान यांचा विजय, भाजपच्या भारती लव्हेकरांचा १६०० मतांनी पराभव
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'अजित पवार पिछाडीवर', अशी खोटी बातमी का दाखवता? अजित पवारांचा सवाल
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार देवेंद्र फडणवीस!"; आई सरिता फडणवीस यांचं मोठं विधान
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : जतमध्ये फडणवीसांच्या शिलेदाराने गड खेचून आणला; गोपीचंद पडळकरांचा मोठा विजय
12
"हा महायुतीच्या एकजुटीचा विजय, जनतेसमोर नतमस्तक", देेवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
13
Mahim Vidhan Sabha Election Result 2024 Live : "एक धनवान अन् एक राजपुत्र, त्यांच्या..."; विजयानंतर महेश सावंतांची पहिली प्रतिक्रिया
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "आम्ही आधुनिक अभिमन्यू, चक्रव्यूह तोडून दाखवला"; एकहाती विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया
15
अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीतील दिग्गजांना पराभवाचा धक्का! थोरात, गडाख, तनपुरे, भांगरे पराभूत
16
Sangamner Vidhan Sabha Election Result 2024 Live : बाळासाहेब थोरातांना पराभवाचा धक्का; नवखे अमोल खताळ ठरले जायंट किलर
17
Anushakti Nagar Vidhan Sabha Result 2024: स्वरा भास्करचा पती फहाद अहमद विरुद्ध सना मलिक, निकाल काय?
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: संस्थान खालसा! विनोद तावडेंना घेरणारे हितेंद्र, क्षितिज ठाकूर पडले; वसई-विरारमध्ये ‘कमळ’ फुलले!
19
भाजपच्या प्रशांत बंब यांचा विजयाचा चौकार; गंगापूरमधून सलग चौथ्यांदा विजयी...
20
Maharashtra Assembly Election Result 2024: अंधेरी पूर्वेत शिवसेनेच्या मुरजी पटेलांची बाजी, उबाठाच्या ऋतुजा लटकेंचा पराभव 

राष्ट्रीय लाेकअदालतीत ९४ खटल्यांचा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 5:00 AM

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष  एस. सी. खटी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. डी. फुलझेले यांच्या मार्गदर्शनाखाली  लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा न्यायाधिश- १ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधिश  आर.एन. मेहरे यांनी पॅनल क्रमांक १ वर पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले. दिवाणी न्यायाधीश एम.आर. वाशिमकर यांनी पॅनल क्रमांक २ वर पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले.

ठळक मुद्देन्यायालयांत आयाेजन : १ काेटी १४ लाखांचा दंड वसूल; विविध प्रकरणांचा समावेश

  लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील विविध न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १२  डिसेंबर रोजी शनिवारला जिल्ह्यात ठिकठिकाणच्या न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ९४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच तब्बल १ कोटी १४ लाख ३९६ रूपयांचा दंड वसुल करण्यात आला.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष  एस. सी. खटी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. डी. फुलझेले यांच्या मार्गदर्शनाखाली  लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा न्यायाधिश- १ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधिश  आर.एन. मेहरे यांनी पॅनल क्रमांक १ वर पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले. दिवाणी न्यायाधीश एम.आर. वाशिमकर यांनी पॅनल क्रमांक २ वर पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एन. पी. वासाडे यांनी पॅनल क्रमांक ३ वर पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले. पॅनल क्रमांक १ मध्ये पॅनल सदस्य म्हणून अ‍ॅड. एस .एल. जनबंधु  आणि विधी स्वयंसेवक अकील शेख  यांनी काम केले. तसेच पॅनल क्रमांक २ मध्ये  अ‍ॅड. सोनाली मेश्राम तसेच विधी स्वयंसेविका वर्षा मनवर  आणि पॅनल क्रमांक ३ मध्ये अ‍ॅड. अमित ए. तागडे  व सामाजिक कार्यकर्ते  दिनेश बोरकुटे यांनी काम केले.लोकन्यायालय यशस्वी करण्याकरिता गडचिरोली जिल्हा वकिल संघाचे जेष्ठ अधिवक्ता आणि वकील संघ व न्यायालयीन कर्मचारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Lokadalatलोकअदालत