गडचिराेली : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गुरुवारी कनेरी येथील प्रियंका हायस्कूलला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दरम्यान, परिसर व व्यवस्थेची पाहणी केली.
इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सध्या सुरू आहेत. काेराेना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. अनेक शाळांमध्ये नियमांचे पालन करून वर्ग भरविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर जि.प. सीईओ कुमार आशीर्वाद यांनी कनेरी येथील प्रियंका हायस्कूलला भेट देऊन इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक समस्या जाणून घेतल्या. दरम्यान त्यांनी काेराेना विषाणूचा संसर्ग राेखण्यासाठी शाळेत केलेल्या उपाययाेजनांची पाहणी केली व व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी जि. प. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजकुमार निकम, प्राचार्य संजय नार्लावार, डी. एस.गडपल्लीवार, डी. के. कांबळे, राजेश निखारे, पी.डब्ल्यू. चौधरी, व्ही. डब्ल्यू. हुलके, शरद गायकवाड, के. आर. पिल्लारे, सी. एन. नंदनवार, आर. ए. बैस, प्रा. सी. एस. हुलके, ए. टी. गंडाटे, कनिष्ठ लिपिक किशाेर गेडाम, शिपाई उमाकांत मंगर उपस्थित हाेते.