राज्यातील १० हजार ५७९ आरोग्य केंद्रात व उपकेंद्रात १९६६ पासून २० रुपयांपासून महिला परिचर कार्यरत आहेत. सध्या महिला परिचरांना केवळ ३ हजार रुपये मानधन देण्यात येते. राज्यात कोरोना महामारीच्या संकटात महिला परिचरांकडून दिवसभर कामे करून घेण्यात आलीत. त्यामुळे राज्यातील १०७ महिला परिचर काेराेनाबाधित झाल्या. याशिवाय महिला परिचरांना आराेग्य विभागाच्या विविध माेहिमेचे काम करावे लागते. शासनाने महिला परिचरांना दरवर्षी गणवेश व भाऊबीज भेट द्यावी. मासिक मानधन दर महिन्याच्या ५ तारखेच्या आत द्यावे, उपकेद्रातील चादर, बेडशिट, पडदे धुलाई भत्ता देण्यात यावा. कार्यक्षेत्रात प्रवास भत्ता द्यावा यांसह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी २६ जुलैपासून जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले जाणार आहे.
जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, सचिव दुधराम रोहनकर, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले उपस्थित राहणार आहेत. आंदाेलनाला नर्सेस संघटना, अंशकालीन महिला परिचर संघाचा पाठिंबा आहे, अशी माहिती नर्सेस संघटनेच्या जिल्हाध्यक्ष माया सिरसाट, प्रभारी अध्यक्ष नीलू वानखेडे, उपाध्यक्ष मंगला चंदनखेडे, कोषाध्यक्ष कल्पना रामटेके, कार्याध्यक्ष बेबी वड्डे यांनी दिली, असे परिचर संघटनेच्या जिल्हाध्यक्ष माधुरी मेश्राम, सचिव साबेरा शेख, कोषाध्यक्ष अपर्णा भोयर, कार्याध्यक्ष सुवर्णा दासरवार यांनी कळविले आहे.