शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
2
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
3
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
4
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले
5
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
6
Blast in Delhi: राजधानी दिल्लीत मोठा स्फोट; तपास यंत्रणा अलर्ट मोडवर
7
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
8
सलग दुसऱ्यांदा शेअर देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट उद्या; ५० रुपयांपेक्षा कमी किंमत
9
खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी
10
सणासुदीच्या काळात Indian Railway मालामाल; तिकीट विक्रीतून कमावले 12 हजार कोटी!
11
IND vs AUS: वर्षभर 'फ्लॉप शो', मात्र ऑस्ट्रेलियात 'विराट' कमबॅक; गावसकरांनी सांगितलं शतकामागचं रहस्य
12
ऑस्ट्रेलियन PM अँथनी अल्बानीज यांनी घेतली टीम इडियाची भेट; किंग कोहलीसोबतचा संवाद चर्चेत (VIDEO)
13
BSNL ची आपल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठी भेट; कंपनीने सुरू केली HD कॉलिंग सेवा...
14
पत्नीसोबत झालं भांडण, रागाच्या भरात पतीने घरच पेटवलं; व्हिडीओ व्हायरल
15
४० हजार कोटींची संपत्ती असणाऱ्या तरुणाने घेतला सन्यास! ऐशोआरामाच्या जीवनाचा का केला त्याग?
16
Maharashtra Politics : ज्यावेळी भाजपला मुख्यमंत्री निवडण्यासाठी ७२ तास लागले,तेव्हा धक्कातंत्र वापरले, नवीन चेहरे आले समोर
17
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून शिंदे बाहेर, फडणवीसवर सस्पेन्स कायम; BJP कसा घेणार निर्णय?
18
कोणीही मुख्यमंत्री झाले तरी...; देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता असतानाच मनोज जरांगेंचा इशारा
19
"बच्चू कडूंना महायुतीमध्ये घेण्याची आवश्यकता नाही, त्यांनी…", भाजपच्या वरिष्ठ नेत्याची स्पष्ट भूमिका
20
Gold Silver Price Today 28 November: तेजीनंतर सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; पाहा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे नवे दर

कर्तबगार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव

By admin | Published: May 02, 2017 1:10 AM

पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील ८७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मान चिन्ह....

उल्लेखनीय कामगिरीची दखल : पालकमंत्र्यांच्या हस्ते ८७ जणांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदानगडचिरोली : पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील ८७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्याकडून जाहीर करण्यात आले. १ मे २०१७ रोजी सोमवारला पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर आयोजित महाराष्ट्र दिनाच्या मुख्य समारंभात जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप रघुनाथ गावित, नवनाथ ठकाजी ढवळे, देसाईगंजचे पोलीस निरिक्षक रविंद्र विनायक पाटील यांचा समावेश आहे. याशिवाय पोलीस दलातील सहायक पोलीस निरिक्षक मनोहर नोरेटी, संदीप मंडलिक, चरणदास पेंदाम, महारुद्र परजपे, अशोक भापकर, देवनाथ काटेंगे, दिलीप पारोटी, बाबुराव पदा, दिनकरशा करोटी, विलास मोरे, सागर शिंदे, दिलीप ढेरे, नंदकुमार कदम, सुनिल गायकवाड, मल्हार थोरात, अक्षयकुमार टिकले, अनिल लपटे, नथ्थू धोटे, शंकर बावणकुळे, तुळशीराम मडावी, मुखरु उसेंडी, विशालचंद उमरे, राजो भिवगडे, बबलु पठाण, विनोद सोनावणे, साधू सिडाम, जलीमखाँ पठाण, पंकज हुलके, भास्कर होळीकर, भोजराज रोठे, किरणकुमार दुर्गम, रविकांत मडावी, संतोष नैताम, किशोर कुमोटी, राजेश रोवतकर, रतिराम पोरेटी, साजिद अलीखान, तेजराव नैताम, लक्ष्मण आलाम, विलास पोरतेर, रविंद्र नैताम, उमाजी आचला, रामचंद्र धुर्वे, अविनाश सडमेक, रविंद्र कुंभारे, संजय मसराम, मोहन तोरेम, करण देवकते, कमलेश येरका, सुरेश मडावी, चंद्रमुनी टोंपे, सुधिर ठाकुर, फतम वंजारी, वेलका वरसे, सोपान कुबे, संदीप वसाके, आदिनाथ फड, राजेश कंजास, मोहन उसेंडी, रोशन गेडाम, विनोद आत्राम, अमितकुमार पांडे, दानसु डुग्गा, छगन तलांडे, रविंद्र मडावी, डोलु तरोटे, संतोष पोटावी, तौसिफ शेख, रमेश आत्राम, राकेश हिचामी, अमर गौरकार, रामसु नरोटे, गणेश उईके, दसरु कुलसामी, विलास पवार, चित्ता मघका, अग्रमण रहाटे, मसहरखान पठाण, राजू गायकवाड, सुरेश रापंजी, बज्जु दहिफळे, गणेश मडावी, प्रमोद दुर्गे, महेंद्र कुमरे, लोकेशकुमार पनिरामलोड, बापू सुरमवार यांचा समावेश आहे. (स्थानिक प्रतिनिधी)स्मार्ट ग्राम झालेल्या ग्रामपंचायतचा गौरवस्मार्ट ग्राम तालुकास्तरीय पुरस्कार अंतर्गत देसाईगंज तालुक्यातील तुळशी, आरमोरी तालुक्यातील वघाळा, एटापल्ली तालुक्यातील जारावंडी, कोरची तालुक्यातील बोदलदंड, कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा, धानोरा तालुक्यातील जांभळी, सिरोंचा तालुक्यातील रामंजापूर, चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव, मुलचेरा तालुक्यातील कालिनगर, अहेरी तालुक्यातील महागाव खुर्द, भामरागड तालुक्यातील आरेवाडा व गडचिरोली तालुक्यातील वाकडी या ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला. सदर पुरस्कार संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांनी पालकमंत्र्यांकडून स्वीकारले.यांचाही झाला सन्मानयाप्रसंगी एटापल्ली तालुक्यातील गुरूपल्लीचे तलांडी जुनघरे यांना रोख पाच हजार रूपये व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच १०० टक्के शाळा डिजिटल केल्याबद्दल बीडीओंचा सत्कार करण्यात आला. पंचायत राज सशक्तीकरणांतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हेटी व गुरवळा तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.