चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक भात पिकाची लागवड केली जाते. शेतकऱ्यांना सर्वाधिक आर्थिक मदतीची आवश्यकता पीक लागवडीच्या सुरुवातीला असते. प्रत्येक वर्षी खते आणि बियाण्यांचा तुटवडा पडत असल्याने शेतकऱ्यांना नेहमीच त्रासाला सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून नियोजन करून खरीप हंगामासाठी आवश्यक बियाणे व खते आधीच उपलब्ध करून द्यावे. तसेच धान पिकावर सर्वाधिक मावा तुडतुडा अशा विविध रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. यावर उपाय म्हणून रासायनिक उपचारापेक्षा जैविक उपचार जास्त उपयुक्त असते यासाठी कामगंध सापळे, निंबोळी अर्क, मेटारायझियम, ट्रायकोकार्ड व जैविक कीटकनाशकांचा वापर सोयीस्कर असते. तसेच शेतकऱ्यांना कीड नियंत्रणावर उपाययोजना कसे करता येईल यासाठी वेळोवेळी रोग नियंत्रण करण्यासंबंधीच्या सूचना व मार्गदर्शन तालुका कृषी विभागाच्या वतीने करावे.
बाॅक्स
मातीनुसार खतांबाबत मार्गदर्शन करावे
मातीची आरोग्य तपासणी करून त्यामध्ये आवश्यकतेनुसार रासायनिक खतांचा वापर व्हावा यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सूचनाफलक जाहीर करून त्यातून नागरिकांना कोणत्या प्रतिच्या मातीसाठी किती रासायनिक खतांचा वापर केला गेला पाहिजे, यासाठी निर्देशन पत्रके लावावीत, अशी मागणी पंचायत समिती सदस्य धर्माशिला सहारे तसेच भेंडाळा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.