गडचिरोली : तालुक्यातील कळमटाेला येथे शिवसेना पक्षाच्या वतीने उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार यांच्या नेतृत्वात मंगळवारी गोरगरीब शेकडो नागरिकांना उबदार कपडे (ब्लँकेट) वाटप करण्यात आले.
शिवसेनेने नेहमीच समाजकारणावर भर दिला आहे. जनतेशी बांधीलकी हेच शिवसेनेेचे धोरण कायम ठेवीत थंडीच्या दिवसांत गोरगरीब नागरिकांना ब्लँकेट वितरण करण्यात येत असल्याचे प्रतिपादन शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार यांनी केले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे सामाजिक कार्य महाराष्ट्रात सुरू आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श शिवसैनिकांनी कायम ठेवला आहे, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हा संघटक विलास कोडापे यांनी केले. ब्लँकेट वितरण कार्यक्रमाला शिवसेना तालुकाप्रमुख गजानन नैताम, उपतालुका प्रमुख यादव लोहंबरे, अमोल मेश्राम, संजय बोबाटे, गणेश पिठाले, स्वप्निल खांडरे, निकेश लोहंबरे, राहुल सोरते, मानिकराव ठाकरे, दिवाकर करकाडे, अरुण वलादे, यादव करकाडे, रूपाली मुरतेली, प्रियंका उंदीरवाडे, गणेश ठाकरे, रामचंद्र ढोणे, वसंत करकाडे, हिवराज उंदिरवाडे, यशवंत चुधरी, रामदास मुरतेली, कवडू करकाडे, पांडुरंग वलादे, रवींद्र ठाकरे, गोविंदा कोडाप, गजानन बावणे, मुखरू निकुरे, भास्कर ठाकरे यांच्यासह नागरिक व शिवसैनिक उपस्थित होते.