लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : तालुक्यातील लोकबिरादरी आश्रम शाळा, हेमलकसा येथील विद्यार्थ्यांना शनिवारी भामरागडचे तहसीलदार कैलास अंडील यांचे हस्ते व लोकबिरादरी आश्रमशाळेच्या व्यवस्थापिका समिक्षा आमटे यांचे पुढाकाराने जातीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. याप्रसंगी नायब तहसीलदार सोनवणे, प्राचार्य डॉ. विलास तळवेकर उपस्थित होते.याप्रसंगी आयोजिक कार्यक्रमात तहसीलदार कैलास अंडील म्हणाले, आदिवासींसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. मात्र जात प्रमाणपत्राअभावी सदर योजनांचा लाभ बऱ्याच आदिवासी बांधवाना मिळत नाही, हे लक्षात आले. त्यामुळे वरिष्ठांशी चर्चा करुन जातीचे प्रमाणपत्र देण्याविषयी आग्रह धरला. वरिष्ठानीही सकारात्मक प्रतिसाद दिला. मी कोतवालांना कामाला लावले. बिनागुंडासारख्या अतिदुर्गम व अतिमागास भागापासून जात प्रमाणपत्र वितरणाची सुरुवात केली. अनेक गावात मी स्वत: जावून प्रमाणपत्र दिले. नागरिकांप्रमाणे विद्यार्थ्यांनाही जातीचे प्रमाणपत्र अत्यावश्यक असल्याने जिल्हा परिषद शाळा व आश्रम शाळांच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधून प्रस्ताव पाठविण्याचे कळविले. बऱ्याच शाळांनी उत्तम प्रतिसाद दिला. मी प्रत्यक्ष माझ्या टीमसह गावागावात जावून जात प्रमाणपत्र दिले. आतापर्यंत तालुक्यात ४ हजार ५०० जातीचे प्रमाणपत्र दिले. येत्या काही महिन्यात तालुक्यात एकही आदिवासी बांधव जातप्रमाणपत्राशिवाय राहणार नाही हा आमचा मानस आहे. त्यासाठी सर्वांच्या सहकायार्ची गरज असल्याचे तहसीलदार अंडील यांनी सांगितले.लोकबिरादरी आश्रम शाळेतील विद्यार्थी संख्या ६५० च्यावर आहे त्यामुळे पहिल्या टप्प्यात काही जात प्रमाणपत्र दिले. अजुन दोन टप्प्यात सर्वच विद्यार्थ्यांना देण्यात येतील, अशी ग्वाही तहसीलदार कैलास अंडील यांनी दिली.
विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:28 PM
तालुक्यातील लोकबिरादरी आश्रम शाळा, हेमलकसा येथील विद्यार्थ्यांना शनिवारी भामरागडचे तहसीलदार कैलास अंडील यांचे हस्ते व लोकबिरादरी आश्रमशाळेच्या व्यवस्थापिका समिक्षा आमटे यांचे पुढाकाराने जातीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. याप्रसंगी नायब तहसीलदार सोनवणे, प्राचार्य डॉ. विलास तळवेकर उपस्थित होते.
ठळक मुद्देलोकबिरादरी शाळेत कार्यक्रम : आतापर्यंत साडेचार हजार नागरिकांना लाभ