सिराेंचा : शिवसेनेच्यावतीने सिराेंचा येथे गरीब व गरजू नागरिकांना धान्य व जीवनाश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. सर्वसामान्यांना मदत करून शिवसेनेने सामाजिक बांधिलकी जाेपासली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेच्यावतीने सिराेंचा तालुक्यासह अहेरी उपविभागात मंगळवारी विविध कार्यक्रम घेण्यात आले. सिराेंचा येथील धर्मपुरी वाॅर्डात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख (अहेरी विधानसभा) व महिला आघाडीच्या जिल्हा संघटक करुणा जाेशी यांच्याहस्ते गरीब कुटुंबांना अन्नधान्य व संसारोपयाेगी साहित्याचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रामुख्याने शिवसेना तालुका प्रमुख अमित तिपट्टीवार, संघटक दुर्गेश तोकला, उपतालुका प्रमुख चंदू बत्तुला, शहर प्रमुख तुषार येन्डे, रफिक कुरेशी, युवा सेना तालुका प्रमुख रूपेश नुकूम, उपप्रमुख किरण रिक्कुला, उज्जव तिवारी, प्रशांत नस्कुरी, जितेंद्र मोते, वेणुगोपाल कोत्तावडला, नागराज बोरला आदी शिवसैनिक उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा. गजानन कीर्तीकर यांच्या प्रेरणेतून तसेच जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख किशाेर पाेतदार यांच्या मार्गदर्शनात आणि सहसंपर्क प्रमुख विलास काेडाप यांच्या सहकार्याने अहेरी विधानसभा क्षेत्रात आठवडाभर साहित्य वितरणाचा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी दिली आहे.
यावेळी सिराेंचा शहरातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित हाेते. उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. अनेकांनी यशस्वितेसाठी सहकार्य केले.