लोकमत न्यूज नेटवर्कजिमलगट्टा : अहेरी तालुक्यातील नक्षलग्रस्त व दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नैनेर येथे बुधवारी उपपोलीस स्टेशन दामरंचाच्या वतीने जनजागरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून गिल्ला गावडे, मासा मडावी, दस्सा वेलादी, लच्चा आत्राम, विजा गावडे, चिन्ना तलांडी, मारोती कोटरामी उपस्थित होते. मेळाव्यादरम्यान पथनाट्या सादर करून नक्षलविरोधी जनजागृती करण्यात आली. नागरिकांनी नक्षल्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. संतोष गायकवाड यांनी नागरिकांनी नक्षल चळवळीत सहभागी होऊ नये, असे आवाहन केले. सोबतच गावातील विविध समस्या जाणून घेत शासकीय योजनांची माहिती दिली. गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी हातपंप निर्माण करण्याचे आश्वासनही दिले. ‘द्या माहिती, व्हा लखपती’ व आत्मसमर्पण योजनेबाबत माहिती दिली.कार्यक्रमाला उपपोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल लवटे, पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे, व्यंकट गंगलवाड, अप्पासाहेब पडळकर, समाधान गायकवाड, अनिल चांदुरे, अभिजीत भोसले, धनंजय विटेकरी, विनायक सपाटे, पीएसआय संदीप जाधव, गंगाराम सिडाम व कर्मचारी उपस्थित होते.२५ सायकलींसह शिलाई मशीनचे वाटपनैनेर येथील जनजागरण मेळाव्यात गावातील नागरिकांना २५ सायकली, १२ शिलाई मशीन, साड्या, पॅन्ट, शर्ट, धोतर, महिलांना वस्त्र, लहान मुलांना कपडे वितरित करण्यात आले. सोबतच युवकांना व्हॉलिबॉल, नेट, बॅटबॉल व अन्य साहित्यांचे वितरण करण्यात आले. या साहित्यामुळे गरजूंना विशेष मदत मिळाली आहे. या मेळाव्याला नैनेर, आसा, मदगू, पालेकसा, कापेवंचा आदी गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी नागरिकांसाठी सहभोजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला.
जीवनावश्यक वस्तूंचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 1:16 AM
अहेरी तालुक्यातील नक्षलग्रस्त व दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नैनेर येथे बुधवारी उपपोलीस स्टेशन दामरंचाच्या वतीने जनजागरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.
ठळक मुद्देनैनेर येथे जनजागरण मेळावा : दामरंचा उपपोलीस ठाण्याचा पुढाकार