कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथराव शिंदे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार धर्मराव बाबा आत्राम, आमदार रामदासजी आंबटकर, आदिवासी विभागाचे विभागीय आयुक्त प्राजक्ता वर्मा, आदिवासी विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील, अहेरीचे प्रकल्प अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीअंकित, भामरागडचे प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता, अहेरी पंचायत समितीचे सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी, बऱ्याच वर्षांनंतर आदिवासी बांधवांना खावटी अनुदान मिळत असल्याचे समाधान व आनंद व्यक्त करून जिल्ह्यात व प्रामुख्याने अहेरी उपविभागात आदिवासी विविध सहकारी सोसायटी कडून धान खरेदी केल्यानंतर गोडाऊन अभावी दरवर्षी धान उघड्यावर खराब व नष्ट होत असते याकडे लक्ष वेधून आदिवासी विकास विभागाने व शासनाने धानाचे गोडाऊनची संख्या वाढवून नव्याने बांधकामाकरिता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी बोलून दाखविले व विकास कामांकरिता विशेष करून जिल्ह्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात यावे अशी आग्रही भूमिका आ. धर्मराव बाबा आत्राम यांनी मांडले.
प्रास्ताविक अहेरीचे प्रकल्प अधिकारी अंकित यांनी तर संचालन शरद चौधरी यांनी केले. आभार सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्रीकांत धोटे यांनी मानले. यावेळी लाभार्थी, विविध खात्याचे कर्मचारी, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
120721\4042img-20210712-wa0179.jpg
अहेरी येथे खावटी अनुदानाचे वाटप करताना आमदार धर्मराव बाबा आत्राम