लोकमत न्यूज नेटवर्ककमलापूर : पोलीस प्रशासन व केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या बटालियन क्रमांक ९ च्या वतीने अहेरी तालुक्याच्या रेपनपल्ली उपपोलीस ठाण्यात दुर्गम भागात असलेल्या तीन गावातील १०० वर नागरिकांना मच्छरदाणीचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी सीआरपीएफ बटालियन क्रमांक ९ चे पोलीस निरिक्षक डी. पी. खंडारे, उपपोलीस स्टेशन रेपनपल्लीचे प्रभारी पोलीस अधिकारी विश्वास शिंगाडे, पोलीस उपनिरिक्षक पांडुरंग हाके यांच्यासह पोलीस कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. कमलापूर भागातील रेपनपल्ली, ताटीगुडम व मोदुमडगू हे तिन्ही गाव जंगलालगतच्या परिसरात आहे. त्यामुळे जंगलातील डासांमुळे या गावातील नागरिकांना हिवतापाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्याच्या दृष्टिकोनातून पोलीस व सीआरपीएफच्या वतीने या तीन गावातील नागरिकांना मच्छरदाणीचे वाटप करण्यात आले. याशिवाय सीआरपीएफतर्फे मरीगुड्डम गावात हातपंप बसवून नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आली.
नागरिकांना मच्छरदाण्यांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 10:53 PM
पोलीस प्रशासन व केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या बटालियन क्रमांक ९ च्या वतीने अहेरी तालुक्याच्या रेपनपल्ली उपपोलीस ठाण्यात दुर्गम भागात असलेल्या तीन गावातील १०० वर नागरिकांना मच्छरदाणीचे वाटप करण्यात आले.
ठळक मुद्देमरीगुड्डममध्ये हातपंप बसविला : पोलीस प्रशासन व सीआरपीएफ बटालियनचा पुढाकार