अतिदुर्गम व अतिसंवेदनशील भागातील शेतकरी व नागरिकांना आधुनिक शेतीसंबंधी माहिती व्हावी, शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून पारंपरिक शेती न करता आधुनिक तंत्रज्ञानाव्दारे शेती कसून आपल्या उत्पन्नात भरघोस वाढ करून आर्थिक स्वावलंबी कसे होता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कमलापूरचे वैद्यकीय अधिकारी सचिन उईके यांनी कोराेना लसीकरणाबाबत जनजागृती करून लस घेण्याबाबत आवाहन केले.
याप्रसंगी पाेलीस उपनिरीक्षक बालाजी चव्हाण यांनी पोलीस दादालोरा खिडकीमार्फत विविध शासकीय योजनांची माहिती दिली जात आहे, तसेच प्रमाणपत्रांचे वितरण केले जात आहे, असे सांगितले. शिबिरादरम्यान नागरिकांची आराेग्य तपासणी करून औषधाेपचार करण्यात आला. मेळाव्याला दामरंचाच्या सरपंच किरण कोडापे, ग्रामसेवक दादाजी पुराम, प्रभारी अधिकारी पंकज मोरे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी चव्हाण व कर्मचारी उपस्थित होते.
230721\23gad_2_23072021_30.jpg
मार्गदर्शन करताना प्रभारी अधिकारी पंकज माेरे, साेबत सरपंच काेडापे.