शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

जिल्ह्यात १६ हंगामी वसतिगृह मंजूर

By admin | Published: January 06, 2017 1:30 AM

रोजगारासाठी स्थलांतरीत होणाऱ्या मजुरांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सर्व शिक्षा

स्थलांतरित मजुरांच्या मुलांसाठी सुविधा : सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून कार्यक्रम गडचिरोली : रोजगारासाठी स्थलांतरीत होणाऱ्या मजुरांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सर्व शिक्षा अभियानच्या मार्फतीने जिल्हाभरात १६ हंगामी वसतिगृह सुरू करण्यात आले आहेत. सदर वसतिगृह या सत्रातील शाळा संपेपर्यंत चालणार आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागातील जनतेला प्रामुख्याने खरीप हंगामातच धान शेतीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होते. त्यानंतर मात्र येथील नागरिकांना रोजगारासाठी वनवन करावी लागते. त्यामुळे ज्या भागात रोजगार उपलब्ध होतो, अशा भागात गडचिरोली जिल्ह्यातील हजारो मजूर स्थलांतरीत होतात. विशेष करून अहेरी, एटापल्ली, सिरोंचा तालुक्यातील नागरिक रोजगारासाठी तेलंगणा, छत्तीसगड राज्यात जातात. विशेष करून डिसेंबर, जानेवारी महिन्यापासून मजूर रोजगारासाठी बाहेर निघतात. रोजगारासाठी जाताना ते आपल्या पाल्यालाही सोबत घेऊन जातात. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होते. ही बाब टाळण्यासाठी सर्व शिक्षा अभियानच्या मार्फतीने गडचिरोली जिल्ह्यात १६ वसतिगृह सुरू केले आहेत. स्थलांतरीत झालेल्या मुलांचे नातेवाईक गावातच राहतात. त्याचबरोबर गडचिरोलीचा परिसर नक्षलदृष्ट्या संवेदनशील आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील १६ ही वसतिगृहे अनिवासी स्वरूपाची आहेत. विद्यार्थ्यांच्या सकाळ व सायंकाळच्या जेवनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळचे जेवन झाल्यानंतर व्यवस्थापक म्हणून नेमलेले शिक्षक संबंधित विद्यार्थ्यांचा सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत अभ्यास घेतात. त्यानंतर त्यांना त्यांच्या नातेवाईकांकडे राहण्यासाठी पाठविले जाते. सदर वसतिगृह त्याच गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये सुरू आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याचे नास्ता व रात्रीच्या जेवनासाठी प्रती दिन ४२ रूपये मंजूर करण्यात आले आहेत. सहा महिन्यांसाठी ७ हजार ५६० रूपये दिले जाणार आहेत. त्याचबरोबर ४० रूपयांचे लेखन साहित्य, १०० रूपयांचे आंघोळीची साबन, केसाचे तेल, कपडे धुण्याचा साबन, आरसा, कंगवा व स्वयंपाकीचे मानधन म्हणून ५०० रूपये असे एकूण प्रती विद्यार्थी सहा महिन्याचे ८ हजार २०० रूपये शाळा व्यवस्थापन समितीला दिले जाणार आहेत. (नगर प्रतिनिधी) वसतिगृह मंजूर करण्यात आलेल्या गावांची नावे कुरखेडा तालुक्यातील जिलहा परिषद उच्च प्राथमिक शाळा धमदीटोला, धानोरा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंदावाही, चामोर्शी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लालडोंगरी, मुलचेरा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा हरीनगर, अहेरी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा देवलमारी, इंदाराम, बोरी, चिंचगुंडी, राजपूर पॅच, किष्टापूर, मरपल्ली, देचलीपेठा, एटापल्ली तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पुरसलगोंदी, नेंडेर, जाजावंडी, गिलनगुडा या ठिकाणच्या शाळांमध्ये हंगामी वसतिगृह मंजूर करण्यात आले आहे. या सर्व वसतिगृहांमध्ये बायोमेट्रीक मशीन लावण्याचे काम सुरू आहे. या वसतिगृहात एकूण ६४७ विद्यार्थ्यांची सोय झाली आहे.