वारसदारांना दिलासा : पंतप्रधान विमा सुरक्षा योजनागडचिरोली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने पंतप्रधान जीवन ज्योती विमा सुरक्षे योजनेंतर्गत सर्पदंशाने मृत्यू झालेल्या महिलेचे वारसदार ज्ञानेश्वर गोविंद लेनगुरे यांना दोन लाखांचा धनादेश बँकेच्या मुख्य कार्यालयात सोमवारी प्रदान करण्यात आला.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गडचिरोली जिल्ह्यात ५४ शाखा असून या शाखांच्या माध्यमातून १५ हजार ग्राहकांना सुरक्षा विमा योजनेत सहभागी करून घेण्यात आले आहे. शहरातील फुले वॉर्डातील पत्राबाई गोविंद लेनगुरे यांनी पंतप्रधान जीवन ज्योती विमा सुरक्षेअंतर्गत ३३० रूपये वार्षिक विमा हप्त्यानुसार विमा पॉलिसी काढली होती. दरम्यान १७ डिसेंबर २०१५ रोजी पत्राबाई लेनगुरे यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. यासंदर्भात बँकेने एलआयसी विमा कंपनीकडे संबंधिताचा प्रस्ताव सादर केला. बँकेच्या पाठपुराव्यातून मृतक महिलेच्या वारसदाराला दोन लाखांचा विमा मंजूर करण्यात आला. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांच्या हस्ते वारसदार ज्ञानेश्वर गोविंद लेनगुरे यांना दोन लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी बँकेचे उपव्यवस्थापक (प्रशासन) टी. डब्ल्यू. भुरसे उपस्थित होते.
जिल्हा सहकारी बँकेतर्फे दोन लाखांचा धनादेश प्रदान
By admin | Published: March 01, 2016 1:00 AM