शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
2
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
3
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित
4
है तय्यार हम! T20 वर्ल्ड कपसाठी सरावाचा श्रीगणेशा; एका ट्रॉफीसाठी १० संघ मैदानात, PHOTOS
5
IDFC first Bank मध्ये IDFC Ltd चे होणार विलीनीकरण; गुंतवणूकदारांचा कसा होणार फायदा?
6
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
7
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
8
Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला
9
मुशीर खानचा भीषण अपघात! मुंबईच्या संघाला मोठा झटका; BCCI ने दिली महत्त्वाची माहिती
10
सलमानसोबत हिट सिनेमा, मात्र करिअरमध्ये अभिनेत्री ठरली अपयशी, १२ वर्षांपासून आहे कलाविश्वातून गायब
11
हिजबुल्लाह चीफ हसन नसरल्लाह 'खतम'! मुलीचाही मृत्यू; इस्रायली लष्कराचा मोठा दावा
12
Investment Tips : गुंतवणूकदारांसाठी आली सुरक्षित गुंतवणुकीची संधी, सरकार उभारणार २० हजार कोटी, तुम्हालाही संधी मिळणार
13
IND vs BAN, 2nd Test Day 2 : एकही चेंडू नाही फेकला अन्.. ९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
14
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
15
Som Pradosh 2024: पितृपक्षात सोम प्रदोष व्रताची संधी म्हणजे दुप्पट लाभ; अवश्य करा 'ही' एक कृती!
16
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
17
फवाद खानच्या पाकिस्तानी सिनेमाला भारतात बंदीच! 'द लीजेंड ऑफ मौला जट' प्रदर्शित होणार नाही, कारण...
18
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
19
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
20
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती

जिल्हाभर महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू

By admin | Published: August 03, 2014 12:06 AM

महसूल कर्मचारी संवर्गाच्या कर्मचाऱ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे महसूल दिनापासून जिल्हाभरातील कर्मचारी आंदोलनावर गेले आहे. १ आॅगस्टपासून चामोर्शी व आरमोरी येथील तहसील

चामोर्शी/आरमोरी : महसूल कर्मचारी संवर्गाच्या कर्मचाऱ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे महसूल दिनापासून जिल्हाभरातील कर्मचारी आंदोलनावर गेले आहे. १ आॅगस्टपासून चामोर्शी व आरमोरी येथील तहसील कार्यालयातील कर्मचारी आंदोलनावर गेले आहेत. त्यामुळे तहसील कार्यालयाचे प्रशासन ठप्प झाले आहे. चामोर्शी येथे नायब तहसीलदार खंडारे, चटगुलवार, मंथनवार व इतर सर्व लिपिक आंदोलनात सहभागी झाले आहे. शासनाने महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे सदर आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती या कर्मचाऱ्यांनी दिली. या आंदोलनाला जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. तामदेव दुधबळे, जि. प. सदस्य संध्या दुधबळे, मारोतराव सोमनकर आदींनी भेट दिली. आरमोरी तहसील कार्यालयाचेही कर्मचारी धरणे आंदोलनात सहभागी झाले आहे. धानोरा येथे आंदोलनात एक मंडळ अधिकारी, ८ अव्वल कारकून, १० लिपिक, ९ शिपाई तसेच १ वाहनचालक सहभागी झाले आहे. तालुक्यातील तब्बल २९ महसूल कर्मचारी संपावर असल्यामुळे प्रशासकीय काम ठप्प झाले आहे. मागण्या निकाली काढल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याचा निर्धार या महसूल कर्मचाऱ्यांनी केला आहे. (शहर प्रतिनिधी)