आॅनलाईन लोकमतगडचिरोली : वनपाल व वनरक्षक यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करावी, या मुख्य मागणीसाठी वनपाल व वनकर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे दिले. या धरणे आंदोलनात जिल्हाभरातील जवळपास तीन हजार वनपाल व वनरक्षक सहभागी झाले होते.वनपाल व वनरक्षक जंगलाच्या संरक्षणाचे काम करतात. त्यांची सेवा पोलीस कर्मचाऱ्याप्रमाणेच आव्हानात्मक आहे. असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले असतानाही वनरक्षक व वनपाल यांना पोलीस दलाप्रमाणे किंवा इतर विभागाप्रमाणे वेतन दिले जात नाही. वेतनामध्ये फार मोठी तफावत आहे. ही तफावत दूर करावी, पोलीस विभागाप्रमाणे प्रोत्साहन भत्ता मंजूर करावा, आहार भत्ता मंजूर करावा, वन्यजीव विभागाकरिता विशेष भत्ता द्यावा, १० वी नापास वनरक्षक व वनपाल यांना कालबध्द पदोन्नती लागू करावी, पोलिसांप्रमाणे कुटुंब आरोग्य योजना लागू करावी, कर्तव्यादरम्यान मृत्यू झाल्यास २५ लाख रूपये अनुदान द्यावे, वनपालांचा कायम प्रवासभत्ता २ हजार ५०० रूपये करावा, दीड पट वेतन द्यावे, नियत क्षेत्राबाहेरची कामे न करणे, आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सोनडवले, वनरक्षक पदोन्नत वनपाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरूण पेंदोरकर, वनरक्षक वनपाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश शेरेकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.आंदोलनात बाजी शेख, चंद्रशेखर तोंबर्लावार, नितीन गडपायले, पुनम बुध्दावार, वर्सल खान, सुनिल पेंदोरकर, श्रीकांत सेलोटे, संजय पिलारे, मोतीराम चौधरी, शैलेश करोडकर, स्मिता तातावार, लोमेश ठाकरे, मोरेश्वर दोडके, आर. एस. कोपुलवार, सुविनय सरकार, एस. बी. मसराम, डी. एस. दहिकर, परशुराम मिस्त्री, घनश्याम राठोड, एस. ए. श्रीरामे, मुकूंदा सिडाम, पी. एफ. वनकर, आर. एस. तर्रेवार, सुरेश निलम, नितीन कुमरे, देविदास दुधबळे, प्रांजय वडेट्टीवार, अतुल धात्रक, हरिश दहागावकर, अजय पोटे, श्रीकांत नन्नावरे, किशोर चांदेकर, रवींद्र जुआरे, दिनेश तेलंग, भारत साबळे, रमेश भुरसे, सुरेश कोपुलवार सहभागी झाले होते.
वनकर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 11:33 PM
वनपाल व वनरक्षक यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करावी, या मुख्य मागणीसाठी वनपाल व वनकर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे दिले.
ठळक मुद्देवेतनश्रेणीत सुधारणा करण्याची मागणी : जवळपास तीन हजार वनरक्षक व वनपालांचा आंदोलनात सहभाग