शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
4
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
5
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
6
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
8
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
9
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
10
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
11
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
12
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
13
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
14
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
15
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
16
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
17
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
19
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
20
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

जिल्हा बंँकेने वाढविला ‘सहकारा’वरील विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 10:25 PM

अलिकडे डबघाईस आलेल्या सहकारी बँका पाहिल्यानंतर सहकार शब्दावरचा विश्वासच उडाला होता. पण प्रतिकूल परिस्थितीतही गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांसह सर्वांना योग्य सेवा देऊन साधलेली प्रगती पाहून सहकारावरील विश्वास वाढविला, असे गौरवोद्गार सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेता भारत गणेशपुरे यांनी काढले.

ठळक मुद्देभारत गणेशपुरेंचे गौरवोद्गार : मोबाईल बँकिंग व मायक्रो एटीएम सेवेचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अलिकडे डबघाईस आलेल्या सहकारी बँका पाहिल्यानंतर सहकार शब्दावरचा विश्वासच उडाला होता. पण प्रतिकूल परिस्थितीतही गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांसह सर्वांना योग्य सेवा देऊन साधलेली प्रगती पाहून सहकारावरील विश्वास वाढविला, असे गौरवोद्गार सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेता भारत गणेशपुरे यांनी काढले.येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मोबाईल बँकिंग व मायक्रो एटीएम सेवेचे लोकार्पण सोमवारी गणेशपुरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार तर प्रमुख अतिथी म्हणून आ.कृष्णा गजबे, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे आणि सर्व संचालक उपस्थित होते.यावेळी गणेशपुरे म्हणाले, जिल्हा सहकारी बँक म्हटल्यानंतर बहुतांश वेळा वयोवृद्ध मंडळीच पदाधिकारी, अधिकारी असतात. पण येथे अध्यक्षापासून मुख्य कार्यकारी अधिकाºयांपर्यंत बरेच लोक तरुण दिसत आहेत. त्यामुळेच या बँकेची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे. बँकेने खेड्यापाड्यातील शेतकरी व इतर खातेदारांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या मोबाईल बँकिंगसारख्या सुविधांचा वापर सर्वच पिढीतील लोकांनी केला पाहीजे. तंत्रज्ञान शिकलो तर हे व्यवहार अधिक सोपे वाटतील, असे ते म्हणाले.यावेळी भारत गणेशपुरे यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरूवातीच्या काळातील किस्से सांगताना बँकांचे महत्वही उपस्थितांना सांगितले. त्या काळात कर्ज घेण्याची प्रक्रिया किती किचकट होती आणि आपण कशा पद्धतीने विविध अडचणींचा सामना केला हेसुद्धा सांगितले.अध्यक्षीय भाषणात प्रंचित पोरेड्डीवार यांनी समाजात परिवर्तनाची सुरूवात तरुणांकडून होते. त्यामुळे बँकिंग क्षेत्रातही तंत्रज्ञानाच्या बाबतीत तरुण परिवर्तन घडवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आ.गजबे यांनी दुर्गम भागापर्यंत जिल्हा सहकारी बँकेच्या सुविधा पाहता अशी सेवा देणारी ही राज्यातील एकमेव बँक असल्याचे सांगितले.प्रास्ताविकात सीईओ आयलवार यांनी बँकेच्या प्रगतीची माहिती दिली. बदलत्या स्पर्धेत बँकिंग क्षेत्रात अनेक बदल झाले. पण त्यात खासगी आणि राष्ट्रीयकृत बँकाच आघाडीवर होत्या. जिल्हा सहकारी बँका आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्यात फारशा पुढे नसल्या तरी गडचिरोली जिल्हा सहकारी बँकेने मात्र सर्वच बाबतीत आघाडी घेतल्याचे त्यांनी सांगितले.सुरूवातीला दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. भारत गणेशपुरे यांनी आपल्या भाषणात काही विनोद किस्से ऐकवून उपस्थितांमध्ये हशा पिकविला. कार्यक्रमासाठी बँकेचे मुख्य व्यवस्थापक अरुण निंबेकर व इतर कर्मचाºयांनी सहकार्य केले.