सभेच्या अध्यक्षस्थानी वामनराव जुआरे हाेते. याप्रसंगी अशोक हाडगे, लता हेमके उपस्थित हाेते. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करून कार्यकारिणी गठित करण्यात आली. अध्यक्षपदी अशोक हाडगे, उपाध्यक्ष प्रा. गौतम डांगे, लता हेमके, कार्याध्यक्ष दत्तराज नरड, सचिव गजानन दहिकर, सहसचिव अरुण पोगळे, कोषाध्यक्ष वासुदेव कुडे, संघटक रामभाऊ काळबांडे, महिला संघटिका म्हणून कल्याणी हिवसे, शीला सोमनकर, बेबीनंदा वाघ, जिल्हा संपर्क प्रमुख केवळराम सहारे, मार्गदर्शक म्हणून चंद्रकांत शिवणकर तर सदस्यपदी रघुनाथ बोरकुटे, अरुण बांते, रमेश चल्लेलवार, सिद्धार्थ भानारकर, प्रमोदराव उत्तरवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ही कार्यकारिणी फक्त जिल्हा परिषद सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित न ठेवता आश्रम शाळा, वनविभागातून तसेच इतरही विभागांच्या आस्थापनातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला. सभेला जवळपास ४० सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते. सभेचे संचालन प्रा. गौतम डांगे, प्रास्ताविक गजानन दहीकर तर आभार उद्धव डांगे यांनी मानले.
===Photopath===
190621\19gad_1_19062021_30.jpg
===Caption===
सभेला उपस्थित सेवानिवृत्त कर्मचारी.