मंगळवारी आरमाेरी तालुक्यातील देलाेडा खुर्द येथील भीमदेव नागापुरे या शेतकऱ्याला वाघाने ठार केले. बुधवारी ही घटना उघडकीस आली. गाेंडपिंपरी तालुक्यातील एक मेंढपाळ कुटुंब आष्टी परिसरात मेंढ्या चारण्यासाठी आले हाेते. मनाेज तिरूपती देवावार या सात वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला करून ठार केले तर धानाेरा तालुक्यातील मेटेजांगदा या गावातील एका महिलेच्या घरी बिबट्या शिरला. वनविभागाने त्याला पकडून जेरबंद केले. एकामागून एक वाघ व बिबट्यांचे हल्ले वाढत चालले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बाॅक्स ....
आष्टीतील बिबट्याने अखेर मुलाचा बळी घेतलाच
मागील दाेन महिन्यांपासून आष्टी परिसरातील पेपर मिल परिसरात बिबट्याचा वावर आहे. काेंबड्या, शेळ्या, बकरे, कुत्रे यांच्यावर बिबट्याने हल्ले करून त्यांना ठार केले. या बिबट्याचा बंदाेबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून हाेत हाेती. मात्र, वन विभागाने लक्ष दिले नाही. अखेर साेमवारी पेपर काॅलनीतील एका मुलावर बिबट्याने हल्ला केला. सुदैवाने यात बालक बचावला. बुधवारी पुन्हा आष्टीपासून तीन किमी अंतरावर असलेल्या मार्कंडा कं. येथे मेंढ्या चारण्यासाठी आलेल्या मुलावर हल्ला केला. त्यात बालक ठार झाला. आता तरी या बिबट्याला जेरबंद करणार काय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
बाॅक्स .......
आठ दिवसांपासून वाघ मिळेना
नरभक्षक असलेल्या वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्यासाठी नागझिरा येथील स्पेशल टीम बाेलाविण्यात आली आहे. मागील आठ दिवसांपासून ही टीम वाघाचा शाेध घेत आहे. मात्र वाघ मिळाला नाही.