लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : फटाक्यामुळे हाेणाऱ्या ध्वनी आणि वायुप्रदूषणाचा परिणाम पशुपक्ष्यांवर हाेताे. हे माहित असून सुद्धा दिवाळीच्या आनंदात फटाके फाेडताना मर्यादेचे भान ठेवले जात नाही. परिणामी दिवाळीच्या काळात अनेक पक्ष्यांसह किटकांचा अकाली मृत्यू हाेताे. प्रकाश फेकणाऱ्या फटाक्यांच्या प्रकाशामुळे पक्ष्यांच्या डाेळ्यांवर अत्यंत विपरित परिणाम हाेताे. अतितीव्र प्रकाशामुळे पक्ष्यांना आंधळेपणा येताे.
अंधारात चाचपडल्यामुळे भींतीवर आदळूनही त्यांचा मृत्यू हाेत असताे. राॅकेट आणि वर जाऊन फुटणाऱ्या फटक्यांमुळे पक्ष्यांचा अधिवास म्हणजे झाडावरील त्यांची घरटी जळतात. पशुपक्ष्यांची ध्वनी ऐकण्याची क्षमता मानवापेक्षा सातपटीने अधिक असते. या आवाजामुळे पक्ष्याच्या कानाच्या नस तुटण्याची शक्यता असते. फटाके फाेडण्याचा सर्वांधिक परिणाम चिमण्यांवर हाेताे. त्यामुळे अतिध्वनी करणाऱ्या व प्रदूषण साेडणाऱ्या फटक्यांवर बंदी घालण्याची मागणी जाेर धरत आहे.