शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
3
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
5
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
6
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
7
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
8
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
9
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
10
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
11
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
12
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
13
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
14
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
15
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
16
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
17
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
18
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
19
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
20
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल

गाेरगरिबांची दिवाळी यावर्षी डाळ आणि साखरेविनाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2021 5:00 AM

गरीब कुटुंबांना स्वस्त धान्य याेजनेंतर्गत केवळ गहू व तांदळाचा पुरवठा केला जाते. दिवाळी सणानिमित्त दरवर्षी या लाभार्थ्यांना एक किलाे साखर व तूर किंवा चण्याची डाळ दिली जात हाेती. हे वर्ष मात्र अपवाद ठरणार आहे. नाेव्हेंबर महिन्याचे नियतन मंजूर झाले असून त्यात केवळ गहू व तांदूळ दिले जाणार आहे. बहुतांश दुकानदारांनी नाेव्हेंबर महिन्यासाठीच्या धान्याचे पैसेही भरले आहेत. मात्र त्यात साखर व डाळीचा समावेश नाही. त्यामुळे या वर्षीच्या दिवाळीत साखर व डाळ मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : धान्य मिळणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना दरवर्षी दिवाळी सणानिमित्त रेशन दुकानातून डाळ व साखर दिली जात हाेती. यावर्षी मात्र अंत्याेदयचे लाभार्थी वगळता इतरांना डाळ व साखर दिली जाणार नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना खुल्या बाजारातून या वस्तू खरेदी करून दिवाळी साजरी करावी लागणार आहे. गरीब कुटुंबांना स्वस्त धान्य याेजनेंतर्गत केवळ गहू व तांदळाचा पुरवठा केला जाते. दिवाळी सणानिमित्त दरवर्षी या लाभार्थ्यांना एक किलाे साखर व तूर किंवा चण्याची डाळ दिली जात हाेती. हे वर्ष मात्र अपवाद ठरणार आहे. नाेव्हेंबर महिन्याचे नियतन मंजूर झाले असून त्यात केवळ गहू व तांदूळ दिले जाणार आहे. बहुतांश दुकानदारांनी नाेव्हेंबर महिन्यासाठीच्या धान्याचे पैसेही भरले आहेत. मात्र त्यात साखर व डाळीचा समावेश नाही. त्यामुळे या वर्षीच्या दिवाळीत साखर व डाळ मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे. अंत्याेदय कार्डधारकांना मात्र पूर्वी प्रमाणेच प्रती कार्ड एक किलाे साखर मिळणार आहे. 

पुन्हा एक महिना मिळणार माेफत धान्य-    काेराेनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने मे ते नाेव्हेंबर महिन्यापर्यंत माेफत धान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिवाळीच्या कालावधीत पुन्हा नाेव्हेंबर महिन्यात माेफत धान्य मिळणार आहे. काेराेनाची लाट आता ओसरली आहे. व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. त्यामुळे माेफत धान्याची याेजना पुढे चालू राहील हे जवळपास कठीण आहे. -    मागील महिन्यात प्रती व्यक्ती दाेन किलाे मका देण्यात आला हाेता. या महिन्यात मात्र मका न देता गहूच दिले जाणार आहेत. अत्यंत कनिष्ठ दर्जाचा मका दिला जात असल्याने लाभार्थी या मक्याचे काहीच करू शकत नाही. हा मका व्यापाऱ्याला विकला जाते.

दिवाळी कशी साजरी करायची?

काेराेनाची लाट ओसरल्याने आर्थिक व्यवहार आता पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र काेराेनाच्या कालावधीत राेजगार न मिळाल्याने कर्ज काढून जीवन जगावे लागले. त्या कर्जाचा बाेजा अजूनही उतरला नाही. आता दिवाळीचा सण आला आहे. हा सण कसा साजरा करावा असा प्रश्न आहे. शासन विविध याेजनांवर काेट्यवधी रूपये खर्च करते. त्या तुलनेत अन्नधान्याच्या याेजनेवर हाेणारा खर्च अत्यल्प आहे. गरिबांच्या पाेटाचा विचार करता रेशन दुकानातून साखर व डाळ देण्यास काहीच हरकत नाही.- शिवराम सडमेक, नागरिक

दुकानदारांचे कमिशन थकले

मे महिन्यापासून रेशन दुकानदार शासनाच्या माेफत धान्याची विक्री करीत आहेत. यावर शासनाकडून त्यांना कमिशन मिळणे अपेक्षित हाेते. मात्र अजूनपर्यंत कमिशन देण्यात आले नाही. मुख्यमंत्री याेजनेंतर्गत मे महिन्यात ग्राहकांच्या धान्याचे पैसे दुकानदारांनी भरले हाेते. हे पैेसे व कमिशनही देण्यात आले नाही. वेळाेवेळी मागणी करूनही कमिशन मिळाले नसल्याने दुकानदारांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. 

 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021