लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : परतीच्या पावसाने गडचिरोली जिल्ह्याला झोडपून काढणे सुरू केले आहे. परतीच्या पावसामुळे धानपिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देऊन याबाबत उपविभागीय अधिकारी दामोदर नान्हे यांच्यासोबत चर्चा केली.धान खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावे, उच्च प्रतीच्या धानाला २ हजार ५०० रूपये प्रतीक्विंटल भाव देण्यात यावा, बारदाण्याची व्यवस्था करावी, धानाचे चुकारे नगदी करावे आदी मागण्यांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. यावेळी कुरूड, कोंढाळा, उसेगाव, फरी, कोरेगाव, चोप, पोटगाव, बोडधा येथील शेतकरी उपस्थित होते.आंदोलनाचे नेतृत्त्व शिवसेना उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम, तालुका प्रमुख नंदू चावला, डॉ. बन्सोड, शंकर बेदरे, दिनेश मोहुर्ले, महेंद्र मेश्राम, पप्पूसिंग बावरी, उज्जू मेश्राम, आतिष कोहचाळे, करण सोनेकर, बंडू कामडी, श्रीहरी दोनाडकर, पंकज पाटील, मनोहर तुकाराम, ग्रा. पं. सदस्य विजय पिंपळकर, गोपाल बोरकर, पवन गेडाम, धनंजय मेश्राम, बाळकृष्ण आत्राम, खुशाबराव पारधी, गोवर्धन दोनाडकर, लक्ष्मण मिसार, चंद्रभागा पारधी यांनी केले.धान उत्पादक शेतकºयांच्या समस्यांबाबत चर्चा केल्यानंतर उपविभागीय अधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सदर निवेदन शासनाकडे पाठवून या मागण्यांसाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन उपविभागीय अधिकाºयांनी आंदोलकांना दिले.
पावसाने झालेल्या धानाच्या नुकसानीचे पंचनामे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 11:29 PM
परतीच्या पावसाने गडचिरोली जिल्ह्याला झोडपून काढणे सुरू केले आहे. परतीच्या पावसामुळे धानपिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.
ठळक मुद्देशिवसेनेची मागणी : देसाईगंज उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक; मागण्यांबाबत चर्चा