ऑनलाईन लोकमतअहेरी : नागेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत पुसूकपल्ली गावात आवश्यक असलेली विकासकामे ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पूर्ण करून गावाचा सर्वांगिण विकास करू, अशी ग्वाही जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दिली.पुसूकपल्ली येथे जि.प. उपाध्यक्ष कंकडालवार यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी जि.प. सदस्य सुनिता कुसनाके, सरपंच सरोज दुर्गे यांच्यासोबत विविध बाबींवर चर्चा केली. यावेळी ग्रा.पं. सदस्य अनिल आलाम, पोलीस पाटील जाकीर सय्यद, विनोद कोटरंगे, सतीश आत्राम, महिला बचत गट सदस्य व गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गावातील तेंदूपत्ता मजुरांनी तेंदूपत्ता बोनसची रक्कम अद्यापही मिळाली नसल्याची बाब कंकडालवार यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी अजय कंकडालवार यांनी बोनसची रक्कम येत्या ८-१० दिवसात मजुरांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही करण्यास भाग पाडू, असे सांगितले. हनुमान मंदिराचे काम पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेवू, असे कंकडालवार म्हणाले. यावेळी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
गावात विकास कामे करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 12:17 AM
नागेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत पुसूकपल्ली गावात आवश्यक असलेली विकासकामे ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पूर्ण करून गावाचा सर्वांगिण विकास करू, .......
ठळक मुद्देउपाध्यक्षांचे आश्वासन : पुसूकपल्लीवासीयांच्या समस्या जाणल्या