शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत बिघडली; AIIMS रुग्णालयात केले दाखल
2
“निरोप द्यायला सभागृहात यायला हवे ना, फेसबुक लाइव्ह करुन...”; शिंदेंचे ठाकरेंना प्रत्युत्तर
3
“सर्वांत जास्त पेपरफूट ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये भीषण चकमक; 3 पाकिस्तानी दहशतवाद्यी ठार
5
“मी तुमचाच, विरोधी पक्षनेते हे केवळ पद नाही तर...”; राहुल गांधींची प्रतिक्रिया, दिली गॅरंटी
6
पाकिस्तानच्या आरोपांपासून ते ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर होण्याच्या प्रश्नावर Rohit Sharmaची भन्नाट बॅटिंग
7
सेमी फायनलपूर्वी राशिद खानवर ICC ची कारवाई; बांगलादेशविरुद्धच्या लढतीतील चूक भोवली
8
काँग्रेस नेते सॅम पित्रोदा परतले; पुन्हा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड
9
"ब्रँड हा ब्रँड असतो! राष्ट्रवादी या ब्रँडला कॉपी करण्याची..."; शरद पवार गटाने सुनिल तटकरेंना डिवचलं
10
मोठी बातमी : भारतीय संघात अचानक करावा लागला बदल, शिवम दुबे... 
11
'बैलगाडीतून जाईन पण Air India मध्ये पुन्हा बसणार नाही', प्रवाशाचा संताप; नेमकं काय झालं?
12
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? नवनीत राणांनी सविस्तर सांगितले
13
“महाघोटाळेबाज सरकारचा चहा घेणे जनतेचा अपमान, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या”: विजय वडेट्टीवार
14
“महायुती पक्की, राज्यात पुन्हा डबन इंजिनचे सरकार येईल”; चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास
15
₹23 रुपयांचा शेअर सुटलाय सुसाट, आली 'तुफान' तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुबंड, 220% नं वधारला
16
“विधानसभेला महायुतीत अजितदादांच्या वाट्याला २० ते २२ जागा येतील”; रोहित पवारांचा टोला
17
"तुरुंगातून बाहेर येऊ नये यासाठी संपूर्ण यंत्रणा प्रयत्नात"; सीएम केजरीवाल यांच्या अटकेवर पत्नी सुनीता केजरीवाल म्हणाल्या,...
18
ईव्ही क्षेत्रातली बडी कंपनी महाराष्ट्रात येणार; 4000 लोकांना रोजगार मिळणार; फडणवीसांची घोषणा
19
विरोधी पक्षनेते झालेले किती नेते पुढे पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले? पाहा...
20
गळाभेट, हातात-हात अन्...; संसद भवनात दिसली चिराग-कंगनाची जबरदस्त केमिस्ट्री! बघा VIDEO

खरंच धान उत्पादकांना दिलासा मिळेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:16 AM

हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी कृषीमंत्र्यांनी शेतकºयांना नापिकीसाठी राज्य शासनाच्या वतीने दिल्या जाणाºया मदतीची घोषणा केली. खरं म्हणजे मदतीची नुसती घोषणाच करायची होती, प्रत्यक्ष लाभ लगेच द्यायचा नव्हता.

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी कृषीमंत्र्यांनी शेतकºयांना नापिकीसाठी राज्य शासनाच्या वतीने दिल्या जाणाºया मदतीची घोषणा केली. खरं म्हणजे मदतीची नुसती घोषणाच करायची होती, प्रत्यक्ष लाभ लगेच द्यायचा नव्हता. तरीही त्या घोषणेसाठी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाचा मुहूर्त निवडण्यात आला. म्हणजे घोषित केलेली मदत कमी आहे म्हणून ओरड करून सभागृहात हंगामा करण्याचा विरोधकांना चान्सच मिळणार नाही, अशी सत्ताधाºयांची चाल त्यांच्यासाठी निश्चितच सोयीची होती. मात्र हंगामा झाला नाही म्हणजे आपण जिंकलो किंवा सुटलो एकदाचे, असे समजण्याचे कारण नाही. ज्या मदतीची घोषणा केली ती खरोखरच शेतकºयांना दिलासा देणारी आहे का? त्याहीपेक्षा ती मदत मुळात शेतकºयांना खरोखरच मिळणार का? याचा सद्सद्विवेकबुद्धीने राज्यकर्त्यांनी विचार करण्याची गरज आहे.यावर्षी बोंडअळी, मावा, तुडतुड्याने विदर्भातल्या कापूस आणि धान उत्पादकांच्या तोंडचा घास पळविला. पाऊस कमी असतानाही पीक बºयापैकी होते. मात्र कीडींचा प्रादुर्भाव झाला आणि पाहता पाहता उभे पीक फस्त होऊ लागले. ज्या पीकाच्या भरोशावर वर्षभराची स्वप्नं रंगविली होती ती आपल्या डोळ्यासमोर धुळीस मिळत असल्याचे पाहून शेतकरी खचून गेला. महागड्या कीटकनाशकाची फवारणी करण्याची सोय नसतानाही अनेकांनी पैशाची जुळवाजुळव करून फवारणी केली, पण मुजोर कीड गेली नाही, उलट काही ठिकाणी फवारणीने माणसांचाच बळी घेतला. गडचिरोली जिल्ह्यात लोकप्रतिनिधींनी शेतांवर जाऊन पाहणी केली.तातडीने सर्व्हेक्षण करून शेतकºयांना मदत द्या, अशी गळ प्रशासनाला, मुख्यमंत्र्यांना केली. मात्र शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा करीत बसलेल्या असंवेदनशिल प्रशासनाच्या नाकावरची माशीही हलली नाही. दिवाळी झाली, शेतातील धानाची कापणी होऊन मळणीही झाली. लागवडीचा खर्चही निघत नसल्याचे पाहून हताश झालेला शेतकरी वर्ग शासकीय मदतीच्या एकमेव आशेवर नजर लाऊन बसला होता. अखेर ७ डिसेंबरला हिवाळी अधिवेशन सुरू असताना शासनाने पीकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश दिला.शेतातल्या पीकाची कापणी आणि मळणी झाल्यावर पीकांच्या नुकसानीचे पंचानामे कसे करायचे? असा प्रश्न सर्वांना पडला. पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. वरातीमागून घोडे चालविण्याचा हा प्रकार शेतकºयांसाठी कितपत फायद्याचा आहे हे माहीत नाही, पण शासनासाठी वेळ मारून नेण्यासाठी पुरेसा आहे. इतर पीकांच्या तुलनेत आधीच धानाच्या नुकसानीसाठी सर्वात कमी मदत मिळणार आहे. त्यातही पंचनाम्यात नुकसानीचे प्रमाण किती दाखविले जाते त्यावर मदतीचे प्रमाण अवलंबून राहणार आहे. त्यामुळे धान उत्पादकांना खरंच या मदतीमुळे दिलासा मिळेल का? हा प्रश्न कायम आहे.