प्रदीप बोडणे।आॅनलाईन लोकमतवैरागड : घिरट्या घालती झाडावरतीचिमण्या, पाखरं, मोरलांडगा आला, कोल्होबा गेलाहरण, चित्र, सांबरंवाघोबा आला, हळू हळू बोला...जिवाला होईल धोका!तुम्ही जंगल तोड नका......अशी आर्त आळवणी करीत अंध रमेशने पर्यावरण रक्षणासाठी जंगल न तोडण्याचा संदेश दिला. औचित्य होते आरमोरी वनपरिक्षेत्र कार्यालयात आयोजित वनदिन कार्यक्रमाचे.आपल्या पूर्वजांनी अतिशय विचारपूर्वक सांभाळून ठेवलेल्या साधन संपत्तीचा आपण उघड्या डोळ्यांनी ºहास पाहत आहोत. वृक्षतोड अशीच चालू राहिल्यास आपण पुढल्या पिढीला भूकंप, महापूर, दुष्काळ, महामारी यापेक्षा अधिक काही देऊ शकणार नाही. हे पाप आपल्या हातून घडू नये, असे वाटत असेल तर जंगल तोडू नका, असा डोळस संदेश अंध रमेशने आपल्या गीतातून दिला.आरमोरी येथे वन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रमेश शिंदे यांच्या पर्यावरण गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. दोन्ही डोळ्यांनी पूर्णत: अंध असलेल्या रमेशने बहारदार व संदेशात्मक गीते सादर केली. आपल्या थोड्याशा स्वार्थासाठी मानव जंगलाचा ºहास करीत आहे. निसर्गाने आपल्याला वनाच्या रूपात स्वर्ग बहाल केला आहे. परंतु आपण त्याचे नरक करायला निघालो. जीव, जंतू, झाडे माणसाचे रक्षकच आहेत. हे सांगताना रमेश म्हणतो....लावला साग, फुलू द्या बाग,लावू नका आग, जंगलाला....निसर्गाने माणसाला सर्वच बहाल केले. तरी मानव इतका निष्ठुर कसा, असा प्रश्न करून उपस्थितांना अंतर्मुख करणारे पर्यावरण गीत सादर करून सगळ्यांना त्याने मंत्रमुग्ध केले. वन परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने अंध रमेशच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी रोख रक्कम मदतीच्या रूपात देण्यात आली.कार्यक्रमाचे संचालन वनरक्षक सपाटे तर आभार के. एस. टिकरे यांनी मानले. याप्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी एच. बी. बारसागडे, रोशनी बैैस, प्रा. प्रदीप बोडणे, मुख्याध्यापक सहारे, महात्मा गांधी विद्यालयाचे पर्यवेक्षक पिलारे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वन परिक्षेत्रातील क्षेत्र सहायक, वनरक्षक व वन कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
पर्यावरण रक्षणासाठी जंगल तोडू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 10:44 PM
घिरट्या घालती झाडावरती चिमण्या, पाखरं, मोर लांडगा आला, कोल्होबा गेला हरण, चित्र, सांबरं वाघोबा आला, हळू हळू बोला... जिवाला होईल धोका!
ठळक मुद्देअंध रमेशची डोळस हाक : आरमोरी वन परिक्षेत्र कार्यालयात कार्यक्रम