शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
3
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
4
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
6
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
7
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
8
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
9
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
10
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
11
धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले
12
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
13
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
14
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
15
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
16
मलिकांवरील गुन्ह्याच्या तपासाची माहिती द्या; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश
17
मनसेच्या पराभूत उमेदवारांना राज ठाकरेंनी दिली उमेद; अडचणी समजावून घेत साधला संवाद
18
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
19
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...

एफडीसीएमला वन जमीन देऊ नका

By admin | Published: May 30, 2014 12:04 AM

घोट वनपरिक्षेत्रांतर्गत २९ खंडातील ५६00.९९८ हेक्टर वन जमीन भंडारा जिल्ह्यातील कोका अभयारण्याकरिता वनविकास महामंडळाला वर्ग करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. सदर वन जमीन दिल्यास

पत्रकार परिषद : घोट व देवदावासीयांचा न्यायालयात जाण्याचा इशारा घोट : घोट वनपरिक्षेत्रांतर्गत २९ खंडातील ५६00.९९८ हेक्टर वन जमीन भंडारा जिल्ह्यातील कोका अभयारण्याकरिता वनविकास महामंडळाला वर्ग करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. सदर वन जमीन दिल्यास प्राण्यांचे जीवन धोक्यात येईल. त्यामुळे सदर वनजमीन महामंडळाला देऊ नये, अशी मागणी पत्रकार परिषदेत करून वन विभागाच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचा इशारा जि.प. सदस्य नामदेव सोनटक्के यांच्यासह दोनही गावातील नागरिकांनी यावेळी दिला. पत्रकार परिषदेत माहिती देताना जि.प. सदस्य नामदेव सोनटक्के म्हणाले, घोट उपक्षेत्रामध्ये २४ व देवदा उपक्षेत्रातील ५ असे एकूण २९ खंड वन विभागाकडून वन विकास महामंडळाला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सदर प्रक्रिया नियमबाह्य आहे, असेही सोनटक्के यावेळी म्हणाले. शासन परिपत्रकानुसार 0.४ कमी घनतेची तसेच सुपीक वन जमीन वनविकास महामंडळाला हस्तांतरित करणे बंधनकारक आहे, असे असतानासुध्दा घोट व देवदा उपक्षेत्रातील २९ खंडातील 0.७ ते ८ इतकी दाट घनतेची वन जमीन वन विकास महामंडळाला देण्याचा घाट घालण्यात आला आहे. मात्र सदर प्रकार घोट व देवदावासीयांच्या हिताच्या विरोधात आहे. सदर वनजमीन महामंडळाला हस्तांतरीत केल्यास या दोन्ही गावातील वनोपज व सरपणाचे हक्क संपुष्टात येतील, असे सोनटक्के यावेळी म्हणाले. घोट परिसरातील वन क्षेत्रात वनोपज गौण खनिजातून शेकडो नागरिकांना रोजगार मिळाला आहे. वन विभागाने खोदतळे निर्माण केल्यामुळे वन्यप्राणी व पशुपक्ष्यांची संख्याही या क्षेत्रात वाढली आहे. घनदाट जंगलाचे प्रमाण लक्षणीय असून या क्षेत्रात २२ ते २७ मीटर उंचीची झाडे मोठय़ा प्रमाणात असल्याची माहिती सोनटक्के यांनी दिली. वन जमीन महामंडळाला हस्तांतरित करू नये, अशी मागणी मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्याची माहिती सोनटक्के यांनी दिली. पत्रकार परिषदेला घोटचे सरपंच बाळा येनगंटीवार, तंमुस अध्यक्ष परशुराम दुधबावरे, ढिवरू बारसागडे, ग्रा.पं. सदस्य गिरीश उपाध्ये, घोटचे पोलीस पाटील अविनाश वडेट्टीवार, ग्रा.पं. सदस्य कवडू भवरे, रामचंद्र दुधबावरे, बाबुराव भवरे, दादाजी बारसागडे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)