आॅनलाईन लोकमतगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नक्षल चळवळीमुळे कंत्राटदार काम करण्यास तयार होत नाही. त्यामुळे पोलीस विभागाच्या संरक्षणात काम करावे लागते. हे असताना सुध्दा विपरित घटना घडल्या आहेत. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात कामाचा वेग मंदावला होता. या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांनी समन्वय साधून काम करावे, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी गडचिरोली जिल्ह्यातील अभियंत्यांसोबत चर्चा करून कामाचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. सभेला पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख उपस्थित होते. पोलीस विभागाने श्रमदानातून काही पूर्व रस्त्यांची निर्मिती केली असल्याची बाब नामदार पाटील यांना सांगण्यात आले. पोलीस विभागाच्या या कृतीचे कौतुक केले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी रस्ते व पुलांचे बांधकाम करणे किती महत्त्वाचे आहे. हे सचित्र समजावून सांगितले.सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रदीप खवले यांनी गडचिरोली जिल्ह्यात पूर्ण झालेल्या तसेच प्रगतीपथावर असलेल्या बांधकामांची माहिती दिली. प्रलंबित असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण केली जातील, अशी माहिती दिली. चर्चासत्राला बांधकाम विभागाचे अधिकारी, कंत्राटदार व कर्मचारी उपस्थित होते.
समन्वय साधून कामे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 11:37 PM
गडचिरोली जिल्ह्यात नक्षल चळवळीमुळे कंत्राटदार काम करण्यास तयार होत नाही. त्यामुळे पोलीस विभागाच्या संरक्षणात काम करावे लागते.
ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे निर्देश : कामाचा घेतला आढावा